संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार कृष्णराव रंधवे तथा चोपदार गुरुजी यांचे निधन 

सुनील राऊत 
Friday, 16 October 2020

संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार ह. भ. प. कृष्णराव रंधवे तथा चोपदार गुरुजी (वय 83) यांचे शुक्रवारी (ता. 16) पहाटे 12.18 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

नातेपुते (सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार ह. भ. प. कृष्णराव रंधवे तथा चोपदार गुरुजी (वय 83) यांचे शुक्रवारी (ता. 16) पहाटे 12.18 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या मागे राजाभाऊ, रामभाऊ ही मुले, दोन मुली, जावई उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

वै. चोपदार गुरुजी यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केले आहे. पालखी सोहळ्यातील ते पहिले पत्रकार होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात शिस्त लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आळंदी - पंढरपूर या मार्गावरील विसाव्यांची, मुक्कामांची ठिकाणे, दिंड्यांचे विसावे यांचे बारकावे व अभ्यास त्यांचा चांगला होता. माऊलींच्या जाताना येतानाच्या प्रवासात त्यांचा सहभाग शेवटपर्यंत असायचा. वारकरी संप्रदायात चोपदार गुरुजी म्हणून त्यांची ख्याती होती. 

चोपदार गुरुजींचा अमृतमहोत्सव आळंदी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर सकाळी आठ वाजता येरवडा (पुणे) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint Dnyaneshwar Maharaj's hereditary Chopdar Krishnarao Randhave Guruji passed away