सांगोला पोलिसांनी पकडली कत्तल करण्याच्या उद्देशाने घेवून जाणारी 31 जनावरे 

Sangola police rescued 31 animals
Sangola police rescued 31 animals

सांगोला (सोलापूर) : जनावरांचे प्रथमोपचाराचे साहित्य न ठेवता, कोणते प्रकारचा पशु वाहतुकीचा बोर्ड न लागता, जनावरांना अपुऱ्या जागेत बांधून तोंड व पाय दोरीने घट्ट बांधून 17 जनावरे पिकअपमधून घेऊन जात असताना आढळली. तसेच इतर 14 जनावरेही बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने सांगोला मार्केट यार्ड बाजार समितीच्या मागे चिलारेच्या झाडाला दोरीने घट्ट बांधून ठेवली होती. या दोन्ही ठिकाची पोलिसांनी 31 जनावरे पकडली असून याबाबत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार (ता. 26) रोजी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना जुना सावे रोड, सिंदखाना भीमनगर, सांगोला येथून एका पांढऱ्या रंगाच्या पिकपमध्ये जनावरे भरून ती कत्तल खाण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत घुले यांच्यासह पोलिसांनी जुना सावे, भीम नगर येथे 17 जनावरे पिकअप (क्रमांक एमएच 45/2295) मध्ये प्रथमोपचाराचे साहित्य न ठेवता, कोणत्याही प्रकारचा पशु वाहतुकीचा बोर्ड न लावता, जनावरांना अपुऱ्या जागेत बसवून, त्यांची तोंडे व पाय दोरीने घट्ट बांधून बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने दिसली. तसेच यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सांगोला मार्केट यार्ड बाजार समितीच्या मागे चिल्लारीच्या झाडाच्या आडोशाला अपुऱ्या जागेत 14 जनावरे बांधून ठेवल्याची माहिती आले. याबाबत पोलिसांनी एकूण 31 जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मिळून आली. पोलिसांनी 1 लाख 86 हजार रुपये किंमतीची जनावरे व एक लाख 50 हजार रुपये किंमतीचा पिकअप असे एकूण तीन लाख 36 हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. 

याबाबत सौरभ शिंदे (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा), दत्ता कसबे (रा. लक्ष्मी दहीवडी, ता. मंगळवेढा), वीर बनसोडे, दादा बनसोडे, स्वप्निल कांबळे (रा. भिमनगर सांगोला), अलीम आयुब कुरेशी, आयुब कुरेशी (रा. अकलूज, ता. माळशिरस), शहाआलम सलाउद्दीन बागवान (चालक, रा. रमामाताचैक, अकलूज, ता. माळशिरस), शाहीबाज फारूख कुरेशी (रा. अकलूज), आर्यन दर्शन दळवी (रा. व्हनमाने प्लट, अकलूज) यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com