सांगोला पोलिसांनी त्या तीन संशयिताकडून 16 मोटारसायकली केल्या जप्त 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

शहरातील पिसे हॉस्पिटल कडलास नाका येथून 20 मे रोजी मोटार सायकल चोरीस गेल्याबाबत संदीप प्रकाश मंडले (रा. राजापूर, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर सांगोला पोलिसानी गोपनीय माहिती काढल्या नंतर चिकमहूद (ता. सांगोला) येथील राहुल गौतम काटे व त्याचे साथीदार हे सांगोला परिसरातील मोटार सायकलची चोरी प्रकरणात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. 

सांगोला(सोलापूर): सोलापूर, सांगली ईत्यादी परिसरातुन मोटारसायकली चोरणाऱ्या तिघांना सांगोला पोलीसांनी पकडले असुन त्यांच्याकडून आतापर्यंत 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजुनही त्यांच्याकडून चोरलेल्या मोटारसायकली मिळण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचाः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण 

शहरातील पिसे हॉस्पिटल कडलास नाका येथून 20 मे रोजी मोटार सायकल चोरीस गेल्याबाबत संदीप प्रकाश मंडले (रा. राजापूर, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर सांगोला पोलिसानी गोपनीय माहिती काढल्या नंतर चिकमहूद (ता. सांगोला) येथील राहुल गौतम काटे व त्याचे साथीदार हे सांगोला परिसरातील मोटार सायकलची चोरी प्रकरणात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. 
सांगोला पोलिसांनी राहुल गौतम काटे, नितीन विठ्ठल गोडसे, सुनील ऊर्फ राजू महादेव नरळे (रा. चिकमहूद, ता. सांगोला) यांना अटक करून त्यांच्याकडून सोलापूर, सांगली ईत्यादी परिसरातील चोरलेल्या आतापर्यंत 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस तपासामध्ये त्यांचे आणखी साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असून आणखी मोटार सायकली जप्त होण्याची शक्‍यता आहे. 
सदर गुन्ह्याचा तपास तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप पर्वते हे करीत असून सदर कारवाई मध्ये पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, वैजिनाथ कुंभार, धनंजय इरकर, संभाजी भोसले यांचा सहभाग होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola police seized 16 motorcycles from the three suspects