सांगोल्याची सिमला मिरची किसान रेल्वेने दिल्लीच्या बाजारपेठेत रवाना 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 20 September 2020

रेल्वे खात्याने बेंगलोर- निजामुद्दीन ही किसान रेल्वे मिरज-पूण व दौंड मार्गे जाणार असल्याचे नियोजन केले होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी वाढली होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ही रेल्वे मिरज, सांगोला व कुर्डुवाडी मार्गे सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज ही किसान रेल सांगोला मार्गे आणली गेली. आता ही रेल्वे सांगोला मार्गे नियमित धावणार आहे. 

सोलापूरः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल नेण्यासाठी रविवारी (ता.20) रोजी बेंगलोर- निजामुद्दीन किसान रेल्वे ही विशेष गाडी मिरजहून कुर्डुवाडीकडे वळवण्यात आली. या रेल्वेने सांगोला तालुक्‍यातील 45 टन सिमला मिरची दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवण्यात आली. 
रेल्वे खात्याने बेंगलोर- निजामुद्दीन ही किसान रेल्वे मिरज-पूण व दौंड मार्गे जाणार असल्याचे नियोजन केले होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी वाढली होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ही रेल्वे मिरज, सांगोला व कुर्डुवाडी मार्गे सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज ही किसान रेल सांगोला मार्गे आणली गेली. आता ही रेल्वे सांगोला मार्गे नियमित धावणार आहे. 

हेही वाचाः पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे एक कोटीचे नुकसान 

या रेल्वेमुळे आता दिल्लीच्या बाजारपेठेत सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांचा शेतमाल पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आज ही किसान रेल सांगोला मार्गे आल्यानंतर शेतकऱ्यांनी एकूण 48 टन सिमला मिरची पाठवण्यात आली. 

हेही वाचाः संभाजी तलावात सुशोभिकरण ; चार्जेस घ्या, पण स्वच्छता ठेवा,सुविधा द्या ! 

या शेतमालाची किमंत दोन लाख 8 हजार रुपये एवढी होती. सांगोला स्थानकावरून हा माल पाठवण्यात आला. दिल्ली भागातील बाजारपेठेत शेतमाल पाठवण्याची संधी या रेल्वेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 
सध्या सोलापूर जिल्ह्यात सांगोला ते दानापूर ही किसान रेल्वे सूरू आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात किसान रेलचा लाभ घेऊ लागले आहेत. 

दानापूर किसान रेल्वेला प्रतिसाद 
या दानापूर किसान रेल्वेच्या आतापर्यंत एकूण दहा फेऱ्या झाल्या आहेत. त्याद्वारे 1255 टन शेतमालाची वाहतूक झाली. यामध्ये डाळिंब, लिंबू व माशांची वाहतूक केली गेली आहे. या मालाची किमंत 58 लाख 16 हजार रुपये एवढी होती. 
- प्रदीपकुमार हिरडे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, भारतीय रेल्वे, सोलापूर.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola's Simla Mirchi Kisan leaves for Delhi market by train