esakal | शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सॅनटायझरची निमीर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सॅनटायझरची निमीर्ती

आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत अशा खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी हॅंड सॅनीटाझरची निर्मिती करावी असे आवाहन शासनाने केले होते.

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सॅनटायझरची निमीर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोज गायकवाड 
श्रीपूर (सोलापूर) ता.3ः कोरोनाच्या संकटात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टीलरीने क्‍लीन ऑल या हॅंड सॅनीटायझरची निर्मिती केली आहे. 
आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत अशा खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी हॅंड सॅनीटाझरची निर्मिती करावी असे आवाहन शासनाने केले होते.

हेही वाचा पाच लाखाचा दोडका जनावरांना खाऊ घालण्याची वेळ 
 त्यासाठी एका दिवसात ऑनलाईन परवाना शासनाने देऊ केला आहे. आतापर्यंत राज्यातील 49 सहकारी व खाजगी कारखान्यांनी हॅंड सॅनीटायझर निर्मितीचे परवाने मिळविले. 
 

हेही  वाचामोठी बातमी मालवाहतूक वाहनांना स्वतंत्र परवान्याची गरज  
 त्यानंतर अनेक कारखान्यांनी ऑनलाईन परवाने मिळविले तरी प्रत्यक्षात काहीच कारखान्यांनी उत्पादन सुरू केले. सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), विठ्ठल कार्पोरेशन (म्हैसगांव), दि सासवड माळी (माळीनगर), ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टीलरी (श्रीपूर), श्री पांडुरंग (श्रीपूर) आणि जकराया या कारखान्यांनी सॅनेटायझर निर्मितीचे परवाने मिळविले आहेत. त्यातील श्रीपूरच्या दि ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टीलरीने उत्पादन व पॅकींग सुरू केले. 

सहा हजार लीटर उत्पादन 
प्रतीदिन सहा हजार लिटर या प्रमाणे 'क्‍लीन-ऑल' या सॅनटायझऱचे उत्पादन सुरू झाले आहे. लवकरच 180 मिली आणि 900 मिली या आकारात देखील उत्पादन तयार होईल - दिनकर बेंबळकर, व्यवस्थापक. ब्रिमासागर डिस्टीलरी. 

go to top