लॉकडाउननंतर आता केळीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

पांडुरंग भगत
Tuesday, 8 September 2020

सोलापूर जिल्ह्यातील कंदर हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनात महत्त्वाचे मानले जाते. मोठ्या प्रमाणावर कंदर येथे केळीचे क्षेत्र असून, पुणे, मुंबईसह इतर देशांतही केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारण दोनशे टन केळी दर दिवसाला कंदरमधून निर्यात केली जाते. कंदरमध्ये आणखी केळीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे कंदर हे केळी उत्पादनात नेहमीच अग्रेसर आहे. 

कंदर (सोलापूर) : गेल्या मार्च महिन्यापासून केळीचे दर कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांनी अक्षरशः एकाच पिकावर केळी मोडण्यास सुरवात केली होती. परंतु, चालू सप्टेंबर महिन्यापासून आनंदाची बाब म्हणजे, केळीचे दर चांगले वाढले आहेत. साधारण दहा ते पंधरा रुपयांपर्यंत केळीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील कंदर हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनात महत्त्वाचे मानले जाते. मोठ्या प्रमाणावर कंदर येथे केळीचे क्षेत्र असून, पुणे, मुंबईसह इतर देशांतही केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारण दोनशे टन केळी दर दिवसाला कंदरमधून निर्यात केली जाते. कंदरमध्ये आणखी केळीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे कंदर हे केळी उत्पादनात नेहमीच अग्रेसर आहे. 

कंदर येथील केळी उत्पादक शेतकरी श्रावण लोकरे म्हणाले, लॉकडाउनमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच मार्च महिन्यापासून केळीला दर मिळत नसल्याने नाराजी होती. मात्र सध्या केळीला चांगला दर वाढल्याने चांगले उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. पुढे केळीला पंधरा रुपयांपर्यंत असाच दर टिकून राहावा. 

केळी निर्यातदार रंगनाथ शिंदे म्हणाले, सध्याच्या घडीला केळीची निर्यात वाढल्याने केळीचा दर चांगला वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दराने केळी देऊ शकतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfaction among farmers now that banana prices have gone up after the lockdown