घरातील वस्तुंचा उपयोग करून सादर केले विज्ञान प्रयोग ; ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 23 September 2020

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन संचलित विज्ञान केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात पुल्ली कन्या प्रशालेच्या एकूण 45 विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

सोलापूरः ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असताना याच पध्दतीने घऱातील वस्तुपासून विज्ञान प्रयोग सादर करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थीनींनी यशस्वी करून दाखवली आहे. विज्ञानाच्या मुलतत्वांचा अभ्यास करून अनेक प्रकारचे वैज्ञानीक प्रयोग या विद्यार्थींनीनी तयार केले. या प्रयोगातून त्यांनी त्यामागील विज्ञानाची तत्वे विशद करत या आगळ्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला. 

हेही वाचाः कृषी विधेयकामार्फत शेती व शेतकरी मोडीत काढण्याचा प्रयत्न ः जिल्हा युवक कॉंग्रेसचे पंढरपुरात आंदोलन 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन संचलित विज्ञान केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात पुल्ली कन्या प्रशालेच्या एकूण 45 विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

हेही वाचाः अतिवृष्टीचा फटका ! सांगोल्यात महावितरणचे 50 लाखांचे नुकसान 

घरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून वॉशिंग मशिन, एक्‍झॉस्ट फॅन, जलपुनर्भरण, सुरळीत ट्राफिक कंट्रोल, मानवी उत्सर्जन संस्था, हवेच्या दाबावरील प्रयोग , भूकंप रोधक, आनंददायी गणिताच्या प्रतिकृती असे अनेक साहित्य शिक्षकांच्या ऑनलाइन मार्गशनाखाली कल्पकतेने बनविले. 
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना स्व-निर्मितीचा आनंद लुटता आला. तसेच वैज्ञानिक संकल्पना समजण्यास सोपे झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी सांगितले. 
विज्ञान शिक्षक अमोल हेरकर , बाळासाहेब गंभीरे, परमेश्वर बाबळसुरे , लक्ष्मी कोंडा, अश्विनी मैसूर, चारुशीला भालेराव , मीनाक्षी कस्तुरे , शुभांगी माने यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक युवराज मेटे व पर्यवेक्षिका कल्पना येमुल यांचे सहकार्य लाभले. विज्ञान केंद्राचे समन्वयक बालाजी चौगुले आणि वीरकुमार वसेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. 
इयत्ता 9 ते 10 वी गट, ः प्रथम क्रमांक ः गौरी मलाबादे (भुकंप सुचना यंत्र) द्वितीय ः सानिया शेख (वाहतुक सिग्नल) तृतीयः माहेश्वरी मादगुंडी (ऍसिड बेस इंडिकेटर). 
इयत्ता 6 वी ते 8 वी गट ः प्रथम क्रमांक प्रशांती चन्ना (वॉशिंग मशिन), द्वितीय मोनिका गणपा (पेरीस्कोप) तृतीय ः ऋतुजा शहापुरकर (गणिती प्रतिकृती)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Science experiments presented in an online science exhibition using household items