ग्राहकांना कांदा स्वस्त अन शेतकऱ्यांना दुप्पट भावाने बियाणे विक्री 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 26 जून 2020

कांदा बियाणांची किंमत साधारण अत्यंत कमी असते. मागील वर्षी कांदा बियाणे एक हजार 200 रुपये बॅग असे होते. बियाणांची किंमत कमी असेल तर कांदा जास्त दराने विकून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने परवडतो. मात्र, यावेळी हा प्रकारच अगदी उलटा झाला. कांद्याचे दर अगदी कमीत कमी 13 रुपयांपासून 20 रुपये प्रतिकिलो एवढे होते. या हंगामासाठी कांदा बियाणे कमी भावात मिळेल असा अंदाज होता. 

सोलापूर: येथील बियाणे बाजारपेठेत या वर्षी कांदा बियाणांचे दर सरळ दुपटीने वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. उत्पादित केलेल्या कांद्याच्या दरापेक्षा बियाणांचे दर अधिक झाल्याने शेतकऱ्यांना महाग दराने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे. मागील वर्षी बियाणे उत्पादक कंपन्यांनी जादा दराने केलेल्या बियाणे खरेदीचा फटका या हंगामात शेतकऱ्यांना बसला आहे. 

हेही वाचाः सोलापुरकरांनो शिस्त पाळा अन्यथा, लॉकडाउन 

कांदा बियाणांची किंमत साधारण अत्यंत कमी असते. मागील वर्षी कांदा बियाणे एक हजार 200 रुपये बॅग असे होते. बियाणांची किंमत कमी असेल तर कांदा जास्त दराने विकून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने परवडतो. मात्र, यावेळी हा प्रकारच अगदी उलटा झाला. कांद्याचे दर अगदी कमीत कमी 13 रुपयांपासून 20 रुपये प्रतिकिलो एवढे होते. या हंगामासाठी कांदा बियाणे कमी भावात मिळेल असा अंदाज होता. 

हेही वाचाः उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल.. 

मात्र, सर्वच बियाणे कंपन्यांनी कांदा बियाणांचे दर थेट दोन हजार 200 रुपये प्रती किलोवर नेऊन ठेवले. तेव्हा शेतकऱ्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. एक हजार रुपयांची वाढ बियाणे दरात झाली. बियाणे उत्पादक कंपन्यांनी मागील वर्षी बियाणे खरेदीचे करार जास्त दराने केले होते. त्यावेळच्या बाजारभावाने हे व्यवहार झाले होते. हे बियाणे या हंगामासाठी बाजारात आल्याने त्याला जादा दर लावण्यात आले. 
याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. या वर्षी खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे घ्यावे लागले आहे. बियाणे महाग दराने घेतले तर पुढे उत्पादित झालेल्या कांद्याला त्या तुलनेत जादा दर भेटले तरच हा व्यवहार शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात बियाणे दरवाढ सोसावी लागणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selling onion cheap to consumers and seeds to farmers at double the price

टॅग्स
टॉपिकस