मोठी ब्रेकींग! 28 जूनला होणारी सेट परीक्षा रद्द; कोरोनामुळे 15 पैकी 'ही' परीक्षा केंद्रे रेड झोनमध्ये

The set exam on June 28 was cancel due to corona
The set exam on June 28 was cancel due to corona

सोलापूर : महाराष्ट्र व गोव्यातील एकूण 1 लाख 11 हजार विद्यार्थ्यांची सेट परीक्षा 28 जून रोजी राज्यातील 15 केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, चंद्रपूर वगळता उर्वरित 14 परीक्षा केंद्रे रेड झोनमध्ये असून 112 महाविद्यालयांच्या इमारतींनाही कुलुप लावण्यात आले आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग असल्याने सेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना या विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सर्वप्रथम या विषाणूमुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करून त्यांचे ग्रेड पर्यायानुसार मूल्यांकन केले जाणार आहे. आता 28 जूनला होणारी सेट परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. आता राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केलेले एमएचटी-सीईटी परीक्षांचे वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता सूत्रांनीव्यक्त केली. 4 जुलैपासून या परीक्षा घेण्याचे नियोजन आहे, परंतु कोरोनाचा विळखा पाहून निर्णय घेऊ, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व सेंटर रेड झोनमध्ये; सेट परीक्षा पुढे ढकलली
सेट परीक्षेसाठी गोवा व महाराष्ट्रातून 1 लाख 11 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परिक्षा पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी येथील 15 केंद्र परिसरातील 112 महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, चंद्रपूर वगळता सर्व परीक्षा केंद्रे रेड झोनमध्ये असून महाविद्यालयही बंद आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 28 जूनला होणारी सेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर ही परीक्षा कधी होईल हे परस्थिती पाहून ठरवले जाईल.
- बाळासाहेब कापडणीस, सेट परिक्षा, समन्वयक, महाराष्ट्र व गोवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com