सोलापूर जिल्ह्यात सात मका खरेदी केंद्रे पुन्हा सूरू 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 26 जून 2020

यावर्षी सोलापूरसह राज्यातील विविध भागात मक्‍याचे मोठे उत्पादन झाले आहे. दरम्यान लॉकडाउनने बाजारपेठांमध्ये शेतीमालाचे भाव पडले होते. ऐन संकट काळात शेतकऱ्यांना कमी दरात मक्‍याची विक्री करावी लागत होती. अशा वेळी राज्य सरकारने हमीभावाने मक्‍याची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. 
त्यानंतर मे महिन्यातच मका खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु बारदाणा उपलब्धत झाला नसल्याने सोलापूर जिल्ह्यात तब्बल एक महिना उशिरा ही केंद्रे सुरू झाली.

पंढरपूर(सोलापूर): केंद्र सरकारने राज्याला दिलेला मका खरेदीचा कोटा संपल्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. कोटा संपल्याने जिल्ह्यातील मका खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हजारो टन मका खरेदी अभावी पडून राहण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली करून पुन्हा सोलापूरसह राज्यातील मका खरेदी केंद्रे सुरू सुरू केली आहेत. यामध्ये पंढरपूरसह जिल्ह्यातील सात केंद्रांचा समावेश आहे. 

हेही वाचा ः सोलापूरकरांनो शिस्त पाळा अन्यथा, लॉकडाउन 

यावर्षी सोलापूरसह राज्यातील विविध भागात मक्‍याचे मोठे उत्पादन झाले आहे. दरम्यान लॉकडाउनने बाजारपेठांमध्ये शेतीमालाचे भाव पडले होते. ऐन संकट काळात शेतकऱ्यांना कमी दरात मक्‍याची विक्री करावी लागत होती. अशा वेळी राज्य सरकारने हमीभावाने मक्‍याची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. 
त्यानंतर मे महिन्यातच मका खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु बारदाणा उपलब्धत झाला नसल्याने सोलापूर जिल्ह्यात तब्बल एक महिना उशिरा ही केंद्रे सुरू झाली. त्यामुळे राज्यासाठी देण्यात आलेला 2 लाख 50 हजार क्विंटल मक्‍याचा कोटा काही ठरावीक जिल्ह्यातच संपवण्यात आला. त्यामुळे सर्वाधिक मका उत्पादन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील हजारो टन मका खरेदी अभावी पडून राहीला होता. 

हेही वाचाः उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल... 

या दरम्यान पंढरपूर येथील मका खरेदी केंद्रावर जवळ पास 20 हजार क्विंटल मक्‍याची नोंदणी झाली होती. केवळ 600 क्विंटल मक्‍याची खरेदी करण्यात आली होती. एका दिवसातच कोटा संपल्याने मका खरेदी केंद्रे बंद करावेत अशा सूचना मिळाल्याने येथील खरेदी विक्री संघाने खरेदी केंद्र बंद केले होते. 
खरेदी विक्री बंद केल्यानंतर शेतकऱ्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांच्या धान्याची शासकीय हमी भावाने खरेदी करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केली होती. दोन दिवसात मका खरेदी केंद्रे सुरू करावीत अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. 

केंद्र सुरू होताच ३००  िक्वंटल खरेदी 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पंढरपुरातील खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र सुरू होताच तीनशे क्विंटल मक्‍याची खरेदी करण्यात आली. 
- शांतीनाथ बागल, अध्यक्ष खरेदी विक्री संघ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven maize shopping centers to be reopened in Solapur district