आदिनाथ कारखान्याला शरद पवार मदत करण्याच्या भूमिकेत! माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांची माहिती 

Anna Kale
Anna Kale

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी देखील सहकार्य केले असून, यापुढेही सहकार्य करण्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची असल्याची माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी दिली आहे. 

शुक्रवारी (ता.17) बारामती येथील गोविंदबाग येथे अप्पासाहेब झांजुर्णे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ कारखान्याच्या अडचणी कानावर घातल्या. याबाबत अधिक माहिती देताना अप्पासाहेब झांजुर्णे यांनी सांगितले, की करमाळा तालुक्‍यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा साखर कारखाना आहे. सध्या हा साखर कारखाना अडचणीत असल्याने साखर कारखाना चालू गळीत हंगामात चालू होईल की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांच्या पगारी, वाहतूकदारांची देणी व कोट्यवधींचे कर्ज अशा स्थितीत कारखान्याचे भवितव्य धोक्‍यात आल्याने याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

याबाबत आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करावी, अशी विनंती केली. त्यावर श्री. पवार यांनी सांगितले, की आदिनाथ कारखाना चालणे गरजेचे आहे म्हणून वेळोवेळी या कारखान्याला मदत केली आहे. हा कारखाना करमाळा तालुक्‍यातील महत्त्वाचा कारखाना आहे. यापुढेही कारखान्याला मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करू. या वेळी राष्ट्रवादीचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com