आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर थकित पगारीसाठी 5 मार्चपासून बेमुदत चक्री उपोषण

The Shetkari Kamgar Sangharsh Samiti has warned that they will go on an indefinite fast in front of Adinath Sahakari Sugar Factory.jpg
The Shetkari Kamgar Sangharsh Samiti has warned that they will go on an indefinite fast in front of Adinath Sahakari Sugar Factory.jpg

करमाळा (सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे दोन वर्षांपासून एफआरपीचे दोन कोटी 32 लाख थकित आहेत. यासह इतर देणी त्वरीत द्यावीत, अन्यथा कारखान्यासमोर 5 मार्चपासून चक्री उपोषण केले जाईल, असा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे यांनी दिला आहे.

शेतकरी कामगार संघर्ष समितीने याबाबत निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एफआरपीची रक्कम आरआरसी कारवाई अंतर्गत सभासदांना लवकरात लवकर देण्यात यावी. तोडणी व वाहतुकीची बिले कारखान्याकडे थकित आह. याची रक्कम सुमारे नऊ कोटी 86 लाख आहे. कारखान्यातील कायम व हंगामी कामगारांचे 61 महिन्यांचे पगार पत्रकातून वसूल करण्यात आलेल्या विविध रकमा कारखान्याने दिल्या नाहीत. ती लवकरात लवकर कामगारांच्या खात्यात जमा करावी. 

कारखाना प्रशासन कारखान्यातील कामगारांच्या नावाने बँकेतून पाच कोटी 11 लाखाचे कर्ज घेऊन परस्पर वापरत आहे. याबरोबर सभासद, तोडणी, वाहतूकदार यांच्या नावे बँकेमधून 18 कोटी 42 लाख कर्ज काढून परस्पर वापरत आहे. सदरची रक्कम ज्याच्या त्याच्या कर्ज खात्यात त्वरीत भरावी. आदी मागण्यासाठी यापुर्वी शेतकरी कामगार संघर्ष समितीने व कामगार संघटनेने अनेकवेळा आंदोलने व उपोषणे केली आहेत. याकडे त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन तहसिलदार, जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त व साखर आयुक्त यांना दिले आहे. या निवेदनावर नानासाहेब साखरे व महादेव मस्के यांच्यासह कामगारांच्या सह्या आहेत.

या आहेत मागण्या

- सभासद एफआरपी अंदाजे रक्कम रु. 2 कोटी 32 लाख
- तोडणी वाहतुकदार यांची बिले अंदाजे रक्कम रु. 9 कोटी 86 लाख
- कायम व हंगामी कामगारांचे 61 महिन्यांचे थकित पगार
- सेवानिवृत्त, राजीनामा, मयत, सोडून गेलेले कमी केलेल्या कामगारांचे फायनल बिल
- मयत कामगार मदत निधी अंदाजे 20 लाख
- 22 महिन्यांचे प्रॉव्हिडंट फंड
- कामगार पतसंस्था वसुली अंदाजे रक्कम रु. 1 कोटी 25 लाख
- 18 टक्के  पगार वाढीचा फरक आंदाजे रक्कम रु. 1 कोटी 82 लाख
- 15 टक्के पगार वाढीचा फरक अंदाजे रक्कम रु. 5 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com