शिरनांदगी तलाव तब्बल अकरा वर्षानंतर 'ओव्हर' फ्लो 

हुकूम मुलानी
Thursday, 1 October 2020

सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या परिसरामध्ये पडलेल्या पावसामुळे हा तलाव ओव्हर प्लो झाला. त्यामुळे या भागात विधानसभेची प्रचार यंत्रणा हाताळणे मुश्‍किल झाले. तत्कालीन रिडालोस उमेदवार आ.भारत भालके यांनी वर्षभरापूर्वी अगोदर संपर्क ठेवला तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील अचानक उमेदवारी या मतदारसंघात जाहीर झाल्यामुळे प्रचार यंत्रणेवर पावसाचा मोठा परिणाम झाला होते. त्या घटनेची आठवण आज या निमित्ताने या भागातील शेतकऱ्यांना झाली. 

मंगळवेढा(सोलापूर) ः शिरनांदगी तलाव म्हैसाळच्या व परिसरामध्ये पडलेला दमदार पावसामुळे तलाव तब्बल अकरा वर्षांनतर ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे किमान वर्षभराची या परिसरातील शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांमध्ये म्हैसाळचे पाणी येवू शकते असा आत्मविश्वास वाढला. 

हेही वाचाः लोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूर मार्गे पुण्याला पळून जात होती पण.... 

सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या परिसरामध्ये पडलेल्या पावसामुळे हा तलाव ओव्हर प्लो झाला. त्यामुळे या भागात विधानसभेची प्रचार यंत्रणा हाताळणे मुश्‍किल झाले. तत्कालीन रिडालोस उमेदवार आ.भारत भालके यांनी वर्षभरापूर्वी अगोदर संपर्क ठेवला तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील अचानक उमेदवारी या मतदारसंघात जाहीर झाल्यामुळे प्रचार यंत्रणेवर पावसाचा मोठा परिणाम झाला होते. त्या घटनेची आठवण आज या निमित्ताने या भागातील शेतकऱ्यांना झाली. 

हेही वाचाः सोलापूर शहरातील गैबी पीर परिसरात घाणीचे साम्राज्य 

म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात येण्यासाठी तब्बल 21 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यासाठी स्व. क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्या माध्यमातून उभारलेली पाणी चळवळ आ. भारत भालके व आ. गणपतराव देशमुख हे विधानसभेत सातत्याने या भागातील पाणीप्रश्नाविषयी आवाज उठवत राहिले. 
राष्ट्रवादीचे नेते तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे या भागातील परिस्थितीची जाणीव करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर पंतप्रधान सिंचन योजनेतून या योजनेचा रखडलेल्या कामासाठी निधी मागील सरकारच्या काळात दिला आहे. त्यामुळे आता या योजनेचे पाणी या तलावात आले. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे अखेर हा तलाव तब्बल अकरा वर्षांनंतर तलाव ओव्हरफ्लो झाला. शिरनांदगी, रड्डे, चिक्कलगी, निंबोणी येथील शेतकऱ्याला पाणी देण्याच्या दृष्टीने सध्या कालव्यात चिलारीचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे साम्राज्य दूर करून या लाभ क्षेत्रात येत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी द्यावे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करावा अशा सूचना आ. भारत भालके यांनी पाणी पूजनाच्या प्रसंगी दिल्या. 
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirnandagi Lake 'Over' flow after eleven years