पंढरपुरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करा; कोणी व का केली मागणी? वाचा 

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्‍यात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना लेखी निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले, की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मागील चार महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ही बाब चिंताजनक बनू लागली आहे. वेळीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर व तालुक्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या पंढरपूकरांच्या चिंतेत भर घालणारी आहे. पंढरपूरकरांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी काही कठोर नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागणार आहे. 

पंढरपूर शहरातील जवळपास सर्वच उपनगरांत तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्गावर कंटेन्मेंट झोन तयार करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. तर शहरातील अंतर्गत भागातही अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. ही परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेत असून, दररोज रुग्णांचा वाढता आकडा पाहता जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर शहरात समूह संसर्गाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे पाहता पंढरपूर शहर व तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व कोरोनाबाधित व्यक्तींची संपर्क साखळी तोडण्यासाठी तातडीने किमान 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करावेत. शहरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग सुधीर अभंगराव, शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शिवसेना पंढरपूर शहरप्रमुख रवींद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख पोपट सावतराव, विनय वनारे, अविनाश वाळके, सचिन बंदपट्टे, लंकेश बुराडे, तानाजी मोरे, अमित गायकवाड, पंकज डांगे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com