शिवसेनेच्या सोलापुरातील नगरसेविका वत्सला बरगंडे यांचे निधन

शिवसेनेच्या सोलापुरातील नगरसेविका वत्सला बरगंडे यांचे निधन

सोलापूर - शिवसेनेच्या येथील नगरसेविका सौ. वत्सला गुलाब बरगंडे (वय-60) यांचे आज पोटाच्या विकाराने निधन झाले. गेल्या दीड वर्षांपासून त्या या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग सहामधून वत्सला बरगंडे शिवसेनेच्या पॅलनमधून निवडून आल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कोयनानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक गणेश वानकर, मनोज शेजवाल, माजी नगरसेवक सुनील खटके , नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुनीता कारंडे यांनी वत्सला बरगंडे यांचे अंतिम दर्शन घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com