लय भारी ! "सर्वोपचार'चा 50 बेडच्या नर्सिंग होमचा प्रस्ताव 

civil-hospital-solapur
civil-hospital-solapur

सोलापूर : सोलापूरसाठी जिल्हा रुग्णालय नसल्याने व जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयांत डॉक्‍टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी प्रस्ताव तयार केला आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून सुमारे 40 कोटींच्या अत्याधुनिक मशिनरींचीही मागणी केल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. 


सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून व कर्नाटकसह परराज्यातून रुग्णांचा कल सर्वोपचार रुग्णालयाकडे वाढत आहे. त्यामुळे बेड कमी पडू लागल्याने नव्या 50 बेडच्या नर्सिंग होमचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येक रुग्णांवर दर्जेदार उपचार करणे सोयीस्कर होईल, असा विश्‍वास डॉ. ठाकूर यांनी व्यक्‍त केला आहे. कोणत्याही रुग्णांवर शस्त्रक्रिया करता यावी, त्यांच्या जखमा कमी होतील, रक्‍तस्त्राव कमी होईल यादृष्टीने रोबोटिक सर्जरीसाठी रोबोट मिळावा, इंडोस्कोपी, लेप्रोस्कोपी व हार्मोनिक कालपेल अशा अत्याधुनिक मशिनरी मिळाव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील उपचार पद्धती अत्याधुनिक व्हावी, रुग्णांची दर्जेदार सेवा करता यावी या हेतूने सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडे सीएसआर फंड मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना सर्वोपचार रुग्णालय पत्र देईल, असेही अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. 


संस्था अन्‌ कंपन्यांना मिळावी कर सवलत 
विविध सामाजिक संस्थांना मदत केल्यानंतर संबंधित कंपन्या अथवा संस्थांना प्राप्तिकरात सवलत दिली जाते. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयास आर्थिक अथवा वस्तूंच्या स्वरूपात मदत करणाऱ्या संस्थांना प्राप्तिकरात सवलत मिळावी, असे पत्र सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने राज्याच्या आरोग्य मंत्रालयास पाठविले आहे. 


सर्वसामान्यांवर स्वस्तात उपचार शक्‍य 
सोलापूर शहर- जिल्ह्यातील कंपन्या, विविध सामाजिक संस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास आर्थिक अथवा वस्तूच्या स्वरुपात मदत करावी. जेणेकरुन सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळतील, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता येतील. शासनाकडून मागणी केली आहे, परंतु कंपन्यांकडून सीएसआर फंड द्यावा, यासाठी प्रयत्नशिल आहे. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com