सोलापूरच्या तरुणाईला खुणावतेय "स्मोक क्रेझ'!  (Video)

सुस्मिता वडतिले
Tuesday, 28 January 2020

सोलापुरातील शाहरुख शेख व त्याचा मित्र आरिफ पटेल हे सोलापूरसाठी काहीतरी नवीन करायचं असं ठरवत होते. त्यासाठी त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. मुंबई, गोवा, हैदराबाद, चेन्नई, केरळ येथे जाऊन तेथील प्रसिद्ध वस्तू, प्रसिद्ध जेवण याबाबत चौकाशी केली. पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरलेल्या "आनंद मेळ्यात' तुम्ही जाताहेत ना? यात खूप नवनवीन प्रकारची दुकाने थाटली आहेत. नवं ते हवं असंल तर ते या यात्रेत मिळत आहे. यातच एक आगळावेगळा स्टॉल यात उभारण्यात आला आहे. तो अनेकांचे लक्ष वेधत आहे. सोलापूरच्या तरुणाईसाठी हा खास आकर्षित करत असलेला स्टॉल आहे. तो म्हणजे "स्मोक क्रेझ'चा. गड्डा यात्रेत पहिल्यांदाच असा स्टॉल लागल्याचा त्यांचा दावा आहे. सहा तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करून एकत्र येत हा स्टॉल उभारला आहे. 
हेही वाचा- तुमच्याकडे ड्रोन आहे का? मग ही बातमी वाचाच.. 
कशी सुचली कल्पना...
सोलापुरातील शाहरुख शेख व त्याचा मित्र आरिफ पटेल हे सोलापूरसाठी काहीतरी नवीन करायचं असं ठरवत होते. त्यासाठी त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. मुंबई, गोवा, हैदराबाद, चेन्नई, केरळ येथे जाऊन तेथील प्रसिद्ध वस्तू, प्रसिद्ध जेवण याबाबत चौकाशी केली. पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, एक दिवस त्यांच्या मित्राने व्हॉट्‌सऍपवर एक व्हिडिओ स्टेट्‌सला अपलोड केला होता. तो म्हणजे स्मोक बिस्किटचा! मित्राचे स्टेट्‌स बघून हा प्रकार सोलापुरात आणण्याचा विचार केला. स्मोक बिस्किट म्हणजे खाल्ल्यानंतर धुरासारखी वाफ निघते. हा प्रकार नवीन असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी सोलापुरात हा नवीन प्रकार आणायचा मानस केला आणि यात्रेत त्यांनी स्टॉल सुरू केला. 
हेही वाचा- आगीचा भडका उडाला आणि..........(VIDEO)
कसा आहे स्मोक क्रेझ
सोलापूरची ओळख असलेली श्री सिद्धेश्‍वरांची गड्डा यात्रा ही जवळ आली होती. त्यामुळे मित्रांनी विचार केला, की आपण आता याची सुरवात करू शकतो. मग स्मोक बिस्किटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते पुण्याला गेले. तिथे मित्राने सामान खरेदी करण्यास मदत केली. पुण्यात गेल्यावर समजले ज्यामुळे धूर येतो तो पदार्थ हवा लागल्यावर उडून जातो. पण नवीन काहीतरी करण्याच्या हेतूने ते पदार्थ घेऊन सोलापूरला आले. यात्रेत हा व्यवसाय सुरूही केला. त्यामुळे यांची टीम खूश झाली. सोलापुरात पहिल्यांदाच हा प्रयोग सुरू केल्यामुळे नवे काहीतरी देता आले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. 
सोलापूरकरांना परवडेल त्या पद्धतीने स्मोकची किंमत त्यांनी ठेवली आहे. स्मोकला लागणारे पदार्थ त्यांनी पुण्यातून आणले आहेत. यातील पदार्थ हा हवेत तरंगणारा आहे. हवेच्या संपर्कात येताच त्याचे रूपांतर वाफेत होते. त्यामुळे बिस्किटमधून धूर आल्याचे दिसून येते. याला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे ते सांगत आहेत. स्मोक पदार्थ बनवण्यासाठी बिस्किटला त्यात बुडवले जाते. चहा-बिस्कीट ज्याप्रमाणे घेतले जाते, त्याचप्रमाणे हे बिस्कीट खाल्ले जाते. शाहरुख शेख व आरिफ पटेलला अरबाज तांबोळी, अक्षय गंगरेड्डी, साजिद तांबोळी हे मदत करतात. सध्या त्यांची टीमच तयार झाली आहे. 

 
टीम वर्क 
कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर टीम वर्क हवे असते. स्मोक बिस्कीट बनवत असलेल्या तरुणाईचे टीम वर्क आहे. पाच जणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या व्यवसायत ज्याच्या हाती जे काम पडेल ते तो करतोच. त्यामुळे व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे ते सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoke craze marks the youth of Solapur