कोरोनापुढे झुकली इटली; अन...

corona.jpg
corona.jpg

सोलापूर : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सध्या दूरचित्रवाणीवर "रामायण' सुरू झाले आहे. पण आताची तरुणाई रामायण बघेल का? त्यांनी त्यांचाच ट्रेड आणला आहे. तो म्हणजे, जुनेच फोटो आपल्या फेसबुक वॉलवर शेअर करण्याचा. त्यावर कमेंट्‌सही भनाट टाकत आहेत. तिकडं रामायण सुरू होण्याचा आणि इकडे जुने फोटो टाकण्याचा ट्रेंड हा योगायोग असल्याचे नेटिजन्स म्हणत आहेत. 
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नवनव्या उपाययोजना करत आहे. त्यात सध्या लॉकडाउनने प्रत्येकजण घरात बसला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून सकारात्मक निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या तरुणाईकडून होत आहे. आपला वेळ घालवण्यासाठी सध्या सोशल मीडियावर तरुणांकडून आपले जुने फोटो पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे म्हणत फोटोवर मित्रमंडळींच्या विनोद कमेंट्‌स सुरू झाल्या आहेत. जुन्या फोटोवर पोस्ट केल्यानंतर त्यावर येणाऱ्या विनोदी कॉमेंट्‌स या ट्रेंडमुळे आणखीन मजा येत आहे. मित्र- मैत्रिणींचे जुने फोटो पाहून चेहऱ्यावर येणारे हसू ही एक वेगळ्या प्रकारची गंमत आहे जी की आताच्या नकारात्मक वातावरणात महत्त्वाची आहे. "होम क्वारंटाइन'च्या काळात दररोज काहीतरी नवीन शक्कल लढवणारी तरुणाई आज आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्याच्यात रमताना दिसून येत आहे. 

या आहेत कमेंट्‌स 
- कोरोनापुढे झुकली इटली; भाऊचा फोटो पाहून म्हणतात मीच लावणार तुझ्या नावाची टिकली. 
- कोरोनाने भाऊ हाय घरी; भाऊला बायको म्हणती चहा करा की कारभारी. 
- हिरव्यागार जंगलात झुळझुळ वाहतो झरा; भाऊचा नुसता फोटो पाहून पोरींचा कोरोना झाला बरा. 
- कोरोनाने अख्खा भारत भंगला; अंजलीला पाहून पोर म्हणतात तुझ्यात जीव रंगला. 
- भाऊंची अदा इतकी मस्त की, पोरी झाल्या कोरोनाग्रस्त. 
- कोरोनाने शहर जरी असलं लॉकडाउन; फोटो पाहून वाढलं हृदयाचं काउंटडाउन. 
- कवी म्हणतात गो करोना गो... कवी म्हणतात गो करोना गो...पोरी म्हणतात कसला चिकना ग ह्यो. 
- कोरोनाने बंद आहे सर्व लॉन्ड्री; मुली- मुलींनाच म्हणतात हाच आहे ग माझा फॅन्ड्री. 
- काल भाऊंनी खाली मेथीची दशमी; गॉगल लावून दिसतोय इमरान हाशमी 
- भाऊंची पाहिली जशी अदा, त्यावर राणू मंडल फिदा 
- फास्ट गाडी चालवून मागे टाकतो सशाला; एवढ्या सुंदर चेहऱ्याला फेअर अँड लवली कशाला. 
- बरगड्या दिसतात इथून तिथून पर पोरी म्हणतात हाच माझा मिथुन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com