'पंतप्रधान मोदींनी जनतेची व भारतीय जवानांची माफी मागावी' 

Congress
Congress

सोलापूर : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यात 20 जवानांचा बळी गेला. सशस्त्र चिनी सैनिकांबरोबर लढताना आपले सैनिक नि:शस्त्र का होते? भारत सरकारने त्यांना शस्त्र पुरविले नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे खोटे वक्तव्य करून चीनला क्‍लीन चिट दिली. गलवान आणि पॅंगॉंग खोरे भारतात नाही का? हा भारतात आहेच म्हणून चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. पंतप्रधान मोदी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यांच्या खोटे बोलण्याचा वापर चीन आणि जागतिक माध्यमांनी बेकायदेशीर कब्जाचे समर्थन करण्यासाठी केला आहे. म्हणून पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर येऊन खरी बाजू मांडली पाहिजे आणि भारतीय जवानांची व जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली. 

शहर-जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहिदों को सलाम म्हणून शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गतनेते चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस अलका राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांचे प्रतीक असलेल्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी भारतीय जवानांवर चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 

या वेळी नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नगरसेविका अनुराधा काटकर, माजी महापौर आरिफ शेख, माजी महापौर नलिनी चंदेले, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, प. म. यंग ब्रिगेड सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रवक्ते नागनाथ कदम, हसीब नदाफ, अरुण साठे, भारत जाधव, युवराज जाधव, सुमन जाधव, सिद्धाराम चाकोते, अशोक कलशेट्टी, सायमन गट्टू, राजासाब शेख, ओमकार गायकवाड, श्रीधर काटकर, अनिल मस्के, अनिल हिबारे, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, लतीफ मल्लाबादकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com