सोलापूर महापालिका क्षेत्रात आज आढळले 30 पॅाझिटीव्ह, एकूण 1107

सोलापूर महापालिका क्षेत्रात आज आढळले 30 पॅाझिटीव्ह, एकूण 1107

सोलापूर - महापालिका हद्दीत शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कोरोनाचे 30 पॅाझिटीव्ह रुग्ण आढळून आले. जिल्हा कारागृहातील 17 जणांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 1107 वर पोचली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत एकूण 152 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 122 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, तर 30 जणांचे अहवाल पॅाझीटीव्ह आले. पॅाझिटीव्ह अहवालामध्ये 17 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. 

आज संगमेश्वरनगर, सोलापूर कारागृह, एकतानगर, निवासी डाॅक्टर वसाहत, विनायकनगर, शुक्रवार पेठ, लोधी गल्ली, सिद्धेश्वर हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, सिद्धेश्वर नगर नई जिंदगी आणि 70 फूट येथील रुग्णांचा समावेश आहे. 

सोलापूर शहरात आतापर्यंत 1107 पॅाझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 647 पुरुष तर 460 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 94 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 446 पॅाझिटीव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 567 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत गेलेे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com