कोरोनासाठी `या` महापालिकेचा कृती आराखडा 

कोरोनासाठी `या` महापालिकेचा कृती आराखडा 

सोलापूर : महापालिकेने कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या काळजीसाठी 14 नागरी आरोग्य केंद्रांत सुविधा केली असून, तब्बल 280 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियान अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनापत्रानुसार ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

राष्ट्रीय आपत्ती समजल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचा जिल्हास्तरीय सर्व्हेक्षण कृती आराखडा तसेच मार्गदर्शक सूचनापत्रानुसार महापालिकेने कोरोना कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी महापालिकेकडून बाळे, सोरेगाव, दाराशा, देगाव, रामवाडी, मजरेवाडी, साबळे, नई जिंदगी, शेळगी, भावनाऋषी, जिजामाता, विडी घरकूल, जोडभावी पेठ, मुद्रा सनसिटी अशी 14 नागरी आरोग्य केंद्रे सज्ज ठेवली आहेत. 

या केंद्रांत वैद्यकीय अधिकारी, पी. एच. एन. कनिष्ठ श्रेणी लिपिक, आशा वर्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात 20 अधिकारी-कर्मचारी अशा 10 केंद्रांत 280 जणांची नियुक्ती केली आहे. याकामी मनपा कर आकारणी, सामान्य प्रशासन विभाग, संगणक विभाग, हद्दवाढ विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, नगरसचिव, गलिच्छ वस्ती सुधारणा, नगरअभियंता, क्रीडा विभाग तसेच विभागीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यावश्‍यक सेवेत करण्यात आली आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com