सोलापूर आयएमएने कोरोना लसीकरणाचे केले जोरदार स्वागत 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 16 January 2021

आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र रायचूर यांनी या बाबत माहिती दिली आहे. आयएमए ने त्यांच्या सदस्यांना सर्वात आधी लस घेऊन भारतीय लस ही सर्वश्रेष्ठ आहे हे सिध्द करावे असे आवाहन केले आहे. कोरोना नियंत्रणात सहभाग घेतलेल्या परिचारिका, पॅरा मेडीकल कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्ता, ऍम्ब्युलन्स कर्मचारी यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना सन्मानपुर्वक लसीकरण केले जावे.

सोलापूरः आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) या वैद्यकीय संघटननेने कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे स्वागत करीत त्यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन संघटनेच्या सदस्यांना केले आहे. 

हेही वाचाः आता एसटी बसचेही कळणार लोकेशन ; सोलापूर जिल्ह्यातील 654 बसगाड्यांना व्हिटीएस सिस्टीम 

आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र रायचूर यांनी या बाबत माहिती दिली आहे. आयएमए ने त्यांच्या सदस्यांना सर्वात आधी लस घेऊन भारतीय लस ही सर्वश्रेष्ठ आहे हे सिध्द करावे असे आवाहन केले आहे. कोरोना नियंत्रणात सहभाग घेतलेल्या परिचारिका, पॅरा मेडीकल कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्ता, ऍम्ब्युलन्स कर्मचारी यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना सन्मानपुर्वक लसीकरण केले जावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्‍टरांनी स्वतः सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लस पोहचवण्याची जबाबदारी घ्यावी. भारतीय संशोधकांनी विकसित केलेली लस ही अत्यंत उपयुक्त आहे. या लसीमुळे समाधानकारक प्रमाणात शरीरात ऍटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे लसीची उपयुक्ततता अत्यंत चांगली आहे. तसेच ही लस भारतीय वातावरणात योग्य पध्दतीने साठवली जाऊ शकते. लसीकरण कार्यक्रमात संघटनेने सक्रिय योगदान द्यावे अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत. 
भारतीय संशोधकांनी तयार केलेल्या लसीच्या दोन्ही प्रकाराबद्दल योग्य सकारात्मक संदेश देऊन लसीकरणाला चालना व पाठबळ देण्याचे काम झाले पाहिजे. लसीकरणाबाबत लोकामध्ये योग्य ती जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे व सॅनिटायझारचा उपयोग आदी नियमांचे पालन करणे चालू ठेवले पाहिजे. या लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र रायचूर, सरचिटणीस डॉ. सचिन मुळे, डॉ. वैशाली शिरशेट्टी आदींनी केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur IMA strongly welcomes corona vaccination