Valentines Day : '... अन् फ्लेक्स लावत डॉक्‍टरने बायकोची माफी मागितली'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची तरतूद बॅंकेत केली होती. मात्र पतीने ते पैसे मिळावे यासाठी पत्नीकडे तगादा सुरू केला. या शिवाय तिला मारण्याची धमकी देणे, मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागला.

पुणे : विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी डॉक्‍टर पतीने फ्लेक्‍सबाजीव्दारे पत्नीची माफी मागितली आहे. हडपसर येथील चौकांमध्ये फ्लेक्‍स लावत पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात 'सॉरी'चा उल्लेख केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉक्‍टर महिलेचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्‍टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- बीएस-6 प्रणालीची वाहने लवकर रस्त्यांवर धावणार : पर्यावरणमंत्री

डॉक्‍टर दाम्पत्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे पत्नीने न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असून डॉक्‍टर दांपत्याचा शनिवारी (15 फेब्रुवारी) लग्नाचा वाढदिवस आहे. रस्त्यात अडवून पत्नीला खून करण्याची धमकी देणे, चेह-यावर अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- व्हॅलेंटाइन्स डेला खुनाचा थरार, संशयी पतीने संपविले सर्वस्व अन्...

याविषयी अधिक माहिती देताना ऍड. ठोंबरे म्हणाले, संबंधित डॉक्‍टर दांपत्यांच्या लग्नाला चार ते पाच वर्ष झाले असून त्यांना एक मुलगी आहे. त्या दोघांमध्ये पुढे काही कारणास्तव वाद होऊ लागल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोट होईपर्यंत दोघांनी एकमेकांशी संपर्क साधू नये, तसेच धमकावून नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

- बीडच्या वृक्षसंमेलनात क्रांती बांगर ठरली वृक्षसुंदरी

मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची तरतूद बॅंकेत केली होती. मात्र पतीने ते पैसे मिळावे यासाठी पत्नीकडे तगादा सुरू केला. या शिवाय तिला मारण्याची धमकी देणे, मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागला. हा सगळा प्रकार सहन न झाल्याने पत्नीने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्‍टर पतीवर शहर विद्रुपीकरण कायद्याव्दारे कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ऍड. ठोंबरे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentines day Doctor apologizes to wife by displaying hoardings in Hadapsar area