ब्रेकिंग! कोव्हिडच्या ड्यूटीला वैतागले शिक्षक; महापालिकेने घेतला "हा' निर्णय 

teachers corona duty
teachers corona duty

सोलापूर : शहरातील एक लाख व्यक्‍तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याच्या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सुमारे 300 शिक्षकांची नियुक्‍ती केली. मात्र, त्यातील दीडशेहून अधिकजण विविध कारणे सांगून रुजू झाले नाहीत. उर्वरित शिक्षकांना 60 ते 70 दिवस सर्व्हेचे काम करावे लागले. त्यामुळे आता 70 हून अधिक शिक्षकांनी ड्यूटी रद्द करावी म्हणून महापालिकेकडे विनंती अर्ज केले आहेत. त्यामुळे आता नव्या शिक्षक-शिक्षिकांची नियुक्‍ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

गंभीर आजार असलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू होण्याची दाट शक्‍यता असते. तर ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा सर्वाधिक धोका मानला जातो. या पार्श्‍वभूमीवर शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सुमारे एक लाख व्यक्‍तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दहा दिवसांच्या कडक संचारबंदीत दररोज सरासरी एक हजार व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली. त्यासाठी महापालिकेने शहर हद्दीतील शिक्षक-शिक्षिकांना सर्व्हेची ड्यूटी दिली होती. नियुक्‍ती दिल्यानंतर अनेकांनी गाऱ्हाणे मांडत कारणांची यादी महापालिकेला दिली. त्यानुसार काहींची ड्यूटी रद्द करण्यात आली तर काहींना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दुसरीकडे, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी नियुक्‍ती पथकांनी प्रामाणिकपणे काम करीत दररोज किमान शंभर संशयितांचा शोध घेतला. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. आता दोन महिन्यांहून अधिक काळ कोव्हिडचे काम करणाऱ्या शिक्षकांनी ड्यूटी रद्द करण्याची मागणी केली आहे. 

ठळक बाबी... 

  • दोन महिन्यांपासून काम करणाऱ्यांनी नियुक्‍ती रद्दसाठी केले अर्ज 
  • शहरातील 70 हून अधिक शिक्षक-शिक्षिकांची केली ड्यूटी रद्दची मागणी 
  • महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानंतरही कामावर न येणाऱ्यांनी खुलासे दिलेच नाहीत 
  • असमाधानकारक खुलासे देणाऱ्यांवरील कारवाईची लागली उत्सुकता 
  • शहरातील अँटिजेन सर्व्हेसाठी महापालिका करणार पुन्हा तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती 

तीनशे शिक्षकांची पुन्हा होणार नियुक्‍ती 
याबाबत उपायुक्त पंकज जावळे म्हणाले, शहरातील कोरोना आता आटोक्‍यात येऊ लागला आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे मागील काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, आणखी काही भागातील ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका नव्याने तीनशे शिक्षकांची नियुक्‍ती करणार आहे. त्याबाबत दोन दिवसांत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर निर्णय घेतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com