... तरीही अधिकाऱ्यांचे हाताची घडी तोंडावर बोट

... तरीही अधिकाऱ्यांचे हाताची घडी तोंडावर बोट

सोलापूर ः मिळकत कराच्या थकबाकीपोटी देण्यात आलेले अनेक धनादेश बाऊन्स होत आहेत, तरीही संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. 

हेलपाटे कोण मारणार 
धनादेश बाऊन्स प्रकरणी संबंधित  मिळकतदाराविरुद्ध पोलिस कारवाई केली तर न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील या भीतीने कारवाई करण्यास अधिकारी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यामुळे आजच्या घडीला जमा असलेल्या धनादेशापैकी 60 ते 70 धनादेश हे बाऊन्स झालेले आहेत. मात्र तरीही संबंधितांविरुद्ध कारवाई केलीली नाही. 

मिळकतदार वेळ मारून नेतात
सध्या महापालिकेची मिळकत कर थकबाकी वसुलीची मोहिम सुरु आहे. थकबाकीपोटी नळजोड तोडणे, जंगम मालमत्ता जप्त करणे आणि प्रसंगी पोलिस कारवाई करणे अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीने अनेक मिळकतदार खात्यावर पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश देतात आणि वेळ मारून नेतात. सुटका झाल्याचे मिळकतदाराला तर वसुली झाल्याची कर्मचाऱ्याला समाधान वाटते. मात्र जमा झालेले धनादेश हे केवळ कार्यालयात शिलकेत पडू लागले आहेत. 

फाैजदारी करण्यात येईल
धनादेश बाऊन्स झालेल्या मिळकतदाराविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा मिळकतदारांची यादी बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती कर संकलन विभागातून देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com