बाळाला घेऊन ती रुळावर धावत सुटली....

solapur railwau ran to madhyapradesh
solapur railwau ran to madhyapradesh

सोलापूर ः येथील रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशातील परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे रविवारी (ता.17) दुपारी दोन वाजता रवाना झाली. एकूण 1236 मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. 
येथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वेच्या मदतीने मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून देण्यात आली. या रेल्वेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मध्यप्रदेशातील मजुरांची माहीती संकलीत करून त्यांची आरोग्य तपासणी केली. एकूण 1236 मजुरांची नोंदणी झाली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण 270 परप्रांतीयांना सात एसटी बस द्वारे रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. नंतर या सर्व प्रवाशीां कागदपत्राची तपासणी करण्यात आली. नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी थर्मल स्क्रिनींग तपासणी पुर्ण केली. 

सर्व प्रवाशांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून हे प्रवाशी स्थानकावर दाखल झाले होते. त्यांना रांगेत थांबवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे खात्याने या प्रवाशांना प्लॅटफार्मवर नेऊन त्यांना तिकीटे उपलब्ध करून दिली. राज्य शासनाने या प्रवाशांच्या तिकीटाचा खर्च उचलला होता. 
एकूण 8 लाख रुपये खर्च तिकीटासाठी झाला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलिस उपायूक्त वैशाली कुर्डूकर, एसीपी प्रीती टीपरे, प्रांत अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार श्री.कुंभार, रेल्वे स्थानकाचे संचालक जी.एन.मीना, स्टेशन मास्टर एस.के.सिंग यांच्यासह रेल्वे, महसूल व आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
गाडी सुटण्याची वेळ झाली असल्याने गाडीने हरी झंडी दाखवली. तेवढ्यात रुळावरून एक महीला बाळाला हातात घेऊन पळत आली. एका हातात कागदपत्रे व दुसऱ्या हातात बाळ घेऊन ती येत होती. तेव्हा तीथे असलेल्या एका व्यक्तीने पळत जाऊन तीच्या हातातील बाळ हातात घेऊन त्यांना स्थानकावर पोचवण्यास मदत केली. अधिकाऱ्यांनी गाडी जास्त वेळ थांबवुन दिला गाडीत बसवले. गाडीत बसल्यानंतर या मातेने कपाळावरील घाम पूसत गावी जाण्याचे स्वप्न पुर्ण झाल्याने आनंद व्यक्त केला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com