सोलापूर एसटी विभाग उत्पन्नामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 2 December 2020

लॉकडाउननंतर सोलापूर विभागातील प्रवाशी वाहतुकीने मोठीच उभारी धरली आहे. विभागातील केवळ शालेय विद्यार्थ्याची वाहतूक वगळली तर इतर सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. दिवाळी सणात विभागाने केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे. या सोबत आता लग्न सराईची तयारी देखील सुरू झाली आहे. 

सोलापूरः एसटीच्या सोलापूर विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, कोरोना सुरक्षा व दिवाळी यामुळे व्यवसायात वाढ झाली आहे. सोलापूर विभागाचे अर्थकारण पुन्हा एकदा कोरोनापूर्वीच्या स्थितीनुसार पूर्ववत झाले आहे. 

हेही वाचाः जनावरे शेतात आल्याने कोयत्याने मारहाण ; तिघे जखमी! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त 

लॉकडाउननंतर सोलापूर विभागातील प्रवाशी वाहतुकीने मोठीच उभारी धरली आहे. विभागातील केवळ शालेय विद्यार्थ्याची वाहतूक वगळली तर इतर सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. दिवाळी सणात विभागाने केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे. या सोबत आता लग्न सराईची तयारी देखील सुरू झाली आहे. 

हेही वाचाः मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकाने केला 201 किलोमिटरचा प्रवास एसटीने ! 

जुन महिन्यापर्यंत लग्नसराईच्या हंगामात विभागाला प्रांसगिक करारातून अडीच ते तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. यावर्षी विवाहसोहळ्यासाठी परवानगी मिळत असल्याने आता प्रासंगिक कराराचे उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे. शालेय वर्गातील नववी ते बारावी प्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शाळाचे वर्ग सुरु झाल्यानंतर त्यासाठी देखील अधिक उत्पन्न मिळणार आहे. या शिवाय माल वाहतुकीचा प्रतिसाद वाढला आहे. खासगी मालवाहतुकीच्या तुलनेत अधिक सुरक्षित व जादा वाहतुकीची क्षमता यामुळे शेतीमालापासून ते घरगुती साहित्याची वाहतूक सुरू झाली आहे. 
आतापर्यंत मिळवलेल्या उत्पन्नामध्ये सोलापूर विभाग पाचवा ठरला आहे. पुणे, जळगाव, ठाणे आदी विभागाच्या स्पर्धेत सोलापूर विभाग आहे. 

ठळक बाबी 
- विभागाचे पंधरा कोटी रुपये मासिक उत्पन्न 
- प्रवासी भारमान साठ टक्‍क्‍यावर 
- 524 एसटी गाड्यांची वाहतूक सूरू 
- 1.90 लाख किमी वाहतूक 
- दत्तजयंतीसाठी गाणगापूरला गाड्या सोडण्याचे नियोजन 
- आंतरराज्य वाहतुकीला चांगली सुरवात 
- मालवाहतुकीसाठी 40 गाड्याद्वारे काम सुरू 
- सत्तर टक्के फेऱ्या नियमित 
- लग्नसराईच्या हंगामात मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा 
- शालेय वाहतुकीमध्ये होणार उत्पन्न वाढ 

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य 
जवळपास सर्वच फेऱ्या शंभर टक्के सुरू केल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने प्रवाशी वाहतूक होऊ लागली आहे. इतर फेऱ्या देखील वाढणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. 
- डि.जी.चिकोर्डे, विभागीय नियंत्रक, सोलापूर विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur ST division ranks fifth in the state in revenue