जेईई, नीट परीक्षा पुढे ढकला; "या' संघटनेने केली मागणी 

प्रमोद बोडके
Friday, 28 August 2020

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या जेईई व नीट या परीक्षा 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा पुढे न ढकलल्यास सोलापूर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन करण्याचा व परीक्षा कोणत्याही सेंटरवर होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूर : सध्या देशात व राज्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. केंद्र सरकारने 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबरला जेईई व नीट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन समोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. परीक्षा पुढे ढकलाव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

हेही वाचा : गणेश दर्शन : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेले श्री अष्टविनायक 

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या जेईई व नीट या परीक्षा 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा पुढे न ढकलल्यास सोलापूर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन करण्याचा व परीक्षा कोणत्याही सेंटरवर होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या वेळी सोलापूर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, परिवहन सदस्य तिरुपती परकिपंडला, उपाध्यक्ष प्रतीक शिंगे, अली बेनोशीर, रजनीकांत जाधव, अक्षय पवार, अजय जाधव, दिनेश डोंगरे, विकी आलाट, अभेद मुन्शी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Students Congress demands postponement of JEE exams