किल्ल्यात गेल्यावर येतो मावळ्यांचा आवाज! अन्‌ मग..

परशुराम कोकणे
Monday, 24 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एखादे गीत निर्माण करावे अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आम्ही फक्त एका दिवसात या गीताचे चित्रीकरण सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात केले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे, असे दिनेश म्याना यांनी सांगितले. 

सोलापूर : सोलापुरातील तरुण कलाकारांनी एकत्र येऊन बनवलेल्या मावळ्यांचा आवाज या अल्बममध्ये गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात चित्रित केलेले हे गाणे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले असून सहा दिवसांत तीन हजार व्हिव्ज मिळाले आहेत. 

खबरदार...! आजारी पडल्यास रहा शाळेपासून दूर ; ही घ्या दक्षता

स्थानिक कलाकारांचा सहभाग
रोल नंबर 18, माझं काळीज यासह अनेक लघुपटांची निर्मिती केलेल्या दिनेश म्याना या युवा दिग्दर्शकाने स्थानिक कलाकारांच्या मदतीने मावळ्यांचा आवाज हे गाणे बनविले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन व एडिटिंगही त्यांनीच केले आहे. उमाकांत गव्हाणे यांनी सहदिग्दर्शक व संवाद लेखक म्हणून साथ दिली आहे. अल्बममध्ये सर्वच कलाकार सोलापूरचे असून यात जगदीश येमूल, संतोष कासे, यश सिंदगी, मनोहर कोम्पेल्ली, संतोष लोमटे यांच्या भूमिका आहेत. 

महास्वामींची खासदारकी गेली तर मी लढणार : ढोबळे

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे गाणे चित्रित केले आहे. यात व्हीएफएक्‍स, मॅटपेंटिंग आणि क्रोमा या सारख्या हॉलिवूडच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आनंद भालेराव व शिवाजी बनसोडे यांनी संगीत दिले आहे. हे गाणं दशरथ शिंदे, आनंद भालेराव यांनी उत्तमरीत्या गायले आहे. सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांच्या सुंदरीचा आवाजही या गाण्याचे महत्त्व वाढवते. रिदम अरेंजर सन्मित रणदिवे यांचे आहे. संगीत संयोजक सुदर्शन माने, व्ही. केंगार यांनी केले आहे. शिवाजी बनसोडे, आसिफ शेख, वैभव हलसगे यांनी कोरस दिले आहे. तुतारी वादक सौरभ गजाकोष, व्हाइस ओव्हर आर्टिस्ट आसिफ शेख यांचे आहे. कॅमेरामन श्रीकांत तुम्मा, कोरिओग्राफर रवी अंबाल, मेकअप काजल जगदाळे, प्रॉडक्‍शन हेड सागर गायकवाड, प्रॉडक्‍शन मॅनेजर विशाल जारंग यांनी आपापली जबाबदारी सांभाळली आहे. 

एका दिवसात केले चित्रीकरण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एखादे गीत निर्माण करावे अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आम्ही फक्त एका दिवसात या गीताचे चित्रीकरण सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात केले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे, असे श्री. म्याना यांनी सांगितले. 

अशी आहे थीम... 
काही मित्र सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात फिरायला जातात. तेव्हा एक मित्र किल्ल्याच्या दगडांवर आपले नाव लिहीत असतो. त्या वेळी आकाशातून त्यांना मावळ्याचा आवाज येतो. मावळा म्हणजे काय असतो हे सांगून गाण्याला सुरवात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur video album news