महास्वामींची खासदारकी गेली तर मी लढणार : ढोबळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्र जातपडताळणी रद्द केल्याचा आज निकाल दिला असून त्यानंतर आता पोट निवडणूक लागणार की न्यायालयात आव्हान दिले जाणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपने जर आपनास पक्षादेश दिला, तर आपण सोलापूर लोकसभेची पोट निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्‍वर महास्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्र जात वैधता दक्षता समितीने अपात्र ठरवले आहे. महास्वामी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून खासदार झाले होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे देखील इच्छुक होते. 

Image may contain: one or more people

प्रमाणपत्र उच्च न्यायालयात खरे ठरेल 
अशातच आता महास्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याची चर्चा आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक लागली तर यामध्येच पक्षाने संधी दिली तर आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवू असा ठाम विश्‍वास ढोबळे यांनी पंढरपुरात व्यक्त केला. परंतु, असे जरी असले तरी महास्वामींचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयात खरे ठरेल असा आशावादही माजी मंत्री ढोबळे यांनी व्यक्त केला. 

सीएएबाबत विरोकांकडून चुकीची माहिती 
एनआरसी आणि सीएएबाबत विरोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. लोकांमध्ये या विषयी जागृती करण्यासाठी उद्या पंढरपुरात सर्वधर्मीय संत मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याचेही श्री. ढोबळे यांनी सांगितले. या वेळी शिवाजी महाराज तनाळीकर उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Mahaswamy's MP goes, I will fight: Dhobale