सोलापूर- विजयपूर महामार्ग 4 नोव्हेंबरपर्यंत बंद ! हलक्‍या वाहनांना मात्र परवानगी

तात्या लांडगे
Tuesday, 20 October 2020

 सोलापूर : विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजीराजे तलाव परिसरातील रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 6 ते 20 ऑक्‍टोबरपर्यंत चालणारे हे नियोजित काम आता 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सोलापूर- विजयपूर रोडवरील वाहतूक या काळात बंद राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली.

रेल्वे ब्रिजखाली अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन टाकली जात आहे. त्यामुळे पत्रकार भवन चौक ते झाशीचा राणी पुतळा हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर जड वाहतूक व हलक्‍या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान, पावसामुळे काम रखडले असून 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी, असे पत्र महापालिकेने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिकेचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली. पत्रकार भवन ते झाशीची राणी पुतळा हा महामार्ग चारचाकी, तीनचाकी व दुचाकी अशा हलक्‍या वाहनांना हा मार्ग खुला करण्यात आला आहे. तर विजयपूरकडून सोलापुरात येणारी जडवाहतूक संत रोहिदास चौक, भारती विद्यापीठ, दावत चौक, गोविंदश्री मंगल कार्यालय, डी- मार्ट, आसरा चौक, महावीर चौक या मार्ग सोडली जात असल्याचेही श्री. काणे यांनी सांगितले. तर तोच मार्ग सोलापुरातून विजयपूरकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur-Vijaypur highway locked till November 4! Drainage work on extension