सोलापूरच्या चित्रपट, नाट्यगृहांना प्रतीक्षा पुन:प्रारंभाची 

Bhagvat Chitr Mandir.jpeg
Bhagvat Chitr Mandir.jpeg

सोलापूर : कधी काळी चित्रपटगृहाचे माहेरघर असलेल्या सोलापूरला कोरोनामुळे ग्रहण लागले असून, लॉकडाउननंतर शासनाने 50 टक्के आसन क्षमतेची अट घालून परवानगी दिली असली तरी अद्यापही चित्रपट व नाट्यगृहांना पुन:प्रारंभाची प्रतीक्षा लागली आहे. लॉकडाउनपासून अद्यापपर्यंत सिनेमागृहे व नाट्यगृहे बंदच आहेत. 


16 नोव्हेंबरपासून सभागृह, नाट्यगृह व सिनेमागृहांना 50 टक्के आसन क्षमेतेची अट घालून प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर निर्माते व कलाकारांनीही आपल्या दरात कपात करून प्रयोगास प्रारंभ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोलपूरचे हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचा नुकताच पुण्यात हास्यकल्लोळचा कोरोनानंतरचा पहिला प्रयोग झाला. प्रयोगाला उत्तम प्रतिसादही मिळाला. मात्र सोलापूरमधील नाट्यगृहे अद्याप बंदच आहेत. नाट्य व्यावसायिक संघ व नाट्य परिषदेने मागणी करूनही महापालिका प्रशासन हुतात्मा स्मृती मंदिराच्या भाडे सवलतीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे सोलापूरमधील नाट्यरसिकांना अजून काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सोलापूर महापालिकेच्या उदासिनतेमुळे नाट्यगृहाच्या भाडे सवलतीचा निर्णय होत नसल्याने लॉकडाउननंतर रंगभूमीवर अद्याप कोणाताही प्रयोग झालेला नाही. 

चित्रपटगृहांना प्रतीक्षा नव्या चित्रपटांची 
भागवत कार्निव्हल सिनेमा येथे "भागी 3' या चित्रपटाचा 16 मार्च रोजी शेवटचा प्रयोग झाला. त्यानंतर अद्यापर्यंत सिनेमागृह बंदच आहे. भागवत कार्निव्हल सिनेमाने यापूर्वी लॉकडाउननंतर नाशिक येथे प्रयोग सुरू करून पाहिले. मात्र, प्रतिसादाअभावी बंद करावा लागला. सध्या कोरोनापासून नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट बंद आहेत. नवा चित्रपट आला, तरच प्रयोग सुरू करता येईल. सध्याचे चित्रपट ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित झालेले आहेत. यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. 

पुण्यात "हास्यकल्लोळ' सोलापुरात उदासिनताच 
सोलापूरचे प्रसिद्ध हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा पुणे येथे नुकातच प्रयोग झाला. पुण्यातील त्यांच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. 
आज ते सोलापूरला परतही येत आहेत. मात्र, सोलापूरमधील सभागृहे अजून सुरू नसल्याने सोलापूर शहरात कोणताच प्रयोग होत नाही. चित्रपटगृहेही बंदच आहेत. तेलुगु चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले लक्ष्मी नारायण चित्रपटगृह लॉकडाउननंतर सुरू झाले असून, जुने तेलुगु चित्रपट सुरू आहेत. इतर सर्व चित्रपटगृहे अद्याप बंदच आहेत. काही चित्रपटगृहांकडे कोणी फिरकत नाहीत. सोलापुरात केवळ एक चित्रपटगृह जुन्या तेलुगु चित्रपटांच्या जीववर सुरू आहे.केवळ एक चित्रपटगृह जुन्या तेलुगु चित्रपटांच्या जीववर सुरू आहे. इतर चित्रपटगृहे व नाट्यगृहे ओस पडली आहेत. 

संपादन : अरविंद मोटे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com