esakal | उन्हाचा चटका सोसू...पण नको "कोरोना' 
sakal

बोलून बातमी शोधा

sun heat

सोलापूरचा मावा अन्‌ पान आले चर्चेत 
सोलापुरात चटणी पान, मगई पान प्रसिद्ध आहे. या पानांशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यातील मावा देखील प्रसिद्ध आहे. कोरोना आणि स्वाईन फ्लू विषाणूंच्या संवादाचे विनोद सोशल मिडियावर व्हायरल होत असून या विषाणूंच्या विनोदी संवादात सोलापूरचा मावा अन्‌ पान चर्चेत आले आहे. कोरोनाच्या भीतीच्या सावटात सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्प देखील चर्चेचा आणि विनोदाचा विषय झाला आहे. 

उन्हाचा चटका सोसू...पण नको "कोरोना' 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरात उन्हाळा आणि कडक उन्हाळा असे दोनच हंगाम मानले जातात. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोलापूरचा पारा वाढतच चालला आहे. कोरोनाच्या भीतीने घबराहट पसरली आहे. सोलापूरकर म्हणतात उन्हाचा चटका वाढला तरी पण चालेल, कोरोन मात्र आला नाही पाहिजे. सोलापूरच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत असतानाही सोलापुरातील नागरिकांना यंदाचा उन्हाळा गोड वाटू लागला आहे. कोरोना विषाणू तापमानात तग धरू शकत नसल्याने कोरोनापेक्षा उन्हाचा चटका बरा अशी स्थिती बघायला मिळत आहे. 
हेही वाचा - सख्या जुळ्या भावंडांनी आईला दिली गोड बातमी 
होळीनंतर उन्हाचा चटका अधिक तीव्र होत जातो. शुक्रवारी (ता. 13) सोलापूर शहर व परिसरात 36 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. आजही उन्हाचा चटका कमालीचा जाणवत होता. आज सोलापुरात 36.2 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान असलेला सोलापूरचा पारा आता 36 अंश सेल्सिअस पार करून पुढे जाऊ लागला आहे. 
हेही वाचा - ग्राहकांसाठी नवा कायदा चांगला पण अंमलबजावणीसाठी थांबला 
उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, गॉगल्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय लस्सी, ताक आणि मठ्ठा देखील आता ठिकठिकाणी मिळू लागला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात सोलापूरचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे रहात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.