esakal | सख्या जुळ्या भावाडांनी आईला दिली गोड बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Twin brothers army in Pandharpur taluka

सैन्यात भरती झाल्याचे कोणतेही सेलिब्रेशन न करता जुळ्या भावाडांनी थेट रक्तदान करुन सैन्यात भरती झाल्याचा आगळावेगळा आनंद ही साजरा केला.
तारापूर येथील ज्ञानेश्वर व मिराबाई शेटे हे पती- पत्नी शेत मजूर म्हणून काम करतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी आपल्या चारही मुलांना शिक्षण दिलं. थोरला मुलगा अमर शेटे हा एमपीएसीचा अभ्यास करत आहे, सर्वात लहान मुलगा सुनिल हा बीएच्या वर्गात शिकत आहे.

सख्या जुळ्या भावाडांनी आईला दिली गोड बातमी

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : तारापूर (ता. पंढरपूर) येथील एकाच दिवशी भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या जुळ्या भावंडांनी आई ‘आम्ही फौजी झालो ग...ही’ गोड बातमी पहिल्यांदा आपल्या आईला दिली... मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने लहानच मोठ करुन शिवकलेल्या आपल्या मुलांची ही गोड बातमी एकूण मिराबाईचं काळीज सुपा ऐवढ झालं. सैन्यात भरती झाल्याचे कोणतेही सेलिब्रेशन न करता जुळ्या भावाडांनी थेट रक्तदान करुन सैन्यात भरती झाल्याचा आगळावेगळा आनंद ही साजरा केला.
तारापूर येथील ज्ञानेश्वर व मिराबाई शेटे हे पती- पत्नी शेत मजूर म्हणून काम करतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी आपल्या चारही मुलांना शिक्षण दिलं. थोरला मुलगा अमर शेटे हा एमपीएसीचा अभ्यास करत आहे, सर्वात लहान मुलगा सुनिल हा बीएच्या वर्गात शिकत आहे. तर विजय आणि अजय शेटे ही जुळी मुलं. ते दोघे अत्यंत हुशार आणि जिद्दी आहेत.
जु्ळ्या विजय आणि अजय यांच दहावीपर्यंतच शिक्षण तारापूर येथे झाले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 11 वीच्या वर्गात प्रवेश घेतला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे दोघांनी हॉटेलमध्ये पार्ट टाईम वेटरची नोकरी करत शिक्षण घेतले. 12 वी सायन्स पास झाल्यानंतर दोघांनीही सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. दोन वर्षापासून ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी कापड, किराणा दुकान, हॉटेलमध्ये काम करुन शिक्षण घेतले. एकीकडे कॉलेज आणि दुसरीकडे दुकानात काम करत करत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात जावून अभ्यास करणे असा त्यांचा दिनक्रम होता. जिद्द आणि तीव्र ईच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सैन्य दलात भरती होण्याचं यश संपादन केले आहे.
अलीकडेच त्यांनी भरतीय सैन्यदलातील सैनिक पदासाठी ( जे.डी) लेखी आणि शारिरीक परीक्षा दिली होती. त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये त्यांची सैनिक म्हणून निवड झाली आहे. सैन्यात भरती होण्याचं अनेक वर्षाचं त्यांचा स्वप्न अखेर पूर्ण झाले.
आम्ही फौजी झालो गं.. अशी आनंदीची गोड बातमी सैन्यात भरती झालेल्या विजय आणि अजयने आई मिराबाईला पहिल्यांदा फोनवरुन ही दिली. आपल्या मुलांची ही गोड बातमी ऐकूण आईच काळीज सुपा ऐवढ झालं. आई आम्ही फौजी झालो ग... हाच टेटसं त्यांनी आपल्या मोबाईलवर ठेवला आहे. त्यांचा मोबाईलवरील टेटस पाहून त्यांच्या अनेक मित्रांनी त्याचं अभिनंदन केले आहे.
सख्या जुळ्या विजय आणि अजय या भावाडांची सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्यांचा मित्रांनी सत्कार केला. यावेळी सोमनाथ आरे, संदीप शिंदे, मोहन पळसे, अमर शेटे उपस्थित होते. गरीब कुटुंबातील सख्या जुळ्या भावंडांची सैन्यदलात भरती झाल्याने परिसरातून त्यांच कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.