रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ranbhaji mahostav.jpg
ranbhaji mahostav.jpg

सोलापूरः कृषी विभागाने आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव कौतुकास्पद आहे. हा स्तुत्य उपक्रम असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वत:चा जीव धोक्‍यात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांचेही कौतुक वाटते. रानभाज्यांसाठी सोलापूर हे ब्रॅंड व्हावे, अशी अपेक्षा माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. 

रानभाज्यांचे आरोग्यातील महत्त्व समजावे यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते, त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अमृत सागर आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

श्री. बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले. महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. लॉकडाउनमध्ये सोलापूर शहरात नागरिकांना भाजीपाला कमी पडू दिला नाही. रानभाजीला आयुर्वेदिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. 
श्री. शंभरकर म्हणाले, ""कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा.'' श्री. दिवाणजी म्हणाले, ""फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी रानभाज्या खाणे महत्त्वाचे आहे.'' यावेळी शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शिवकुमार सदाफुले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 


या रानभाज्या आल्या विक्रीसाठी 
या महोत्सवात चुका भाजी, अंबाडी, गुळवेल, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, इचका, टाकळा, चंदन बटवा, करडई आणि कुरडू या रानभाज्या विक्रीसाठी आहेत. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले उपयोग याची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली. 

बांधावरच्या भाज्या ताटात 
अनेक रान भाज्या शेतात पिकतात, मात्र माहिती अभावी या भाज्यांचा वापर आहारात होत नाही. केन्ना, टाकळा, शेवग्याचा पाला, बांबूचा कोवळा पाला व कोंब या सारख्या अनेक वनस्पती आहारात असणे आवश्‍यक आहे. मात्र त्याबद्दलचे महत्त्व माहिती नसल्याने शेतात बांधावर पिकणाऱ्या या वनस्पतींचा आहारात सहसा वापर होत नाही. या महोत्सवामुळे रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समोर आले आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com