सोयाबीनला फुटले कोंब ; एैन काढणीच्या वेळी पावसाने नुकसान 

शांतीलाल काशीद
Sunday, 27 September 2020

अगोदरच गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.तर दुसरीकडे अतिवृष्टीसारखं आस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.तालुक्‍यातील उपळे,नारी, पानगाव मंडल क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सोयाबिन उडीद, कांदा ऊस पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

मळेगाव(सोलापूर)ः बार्शी तालुक्‍यातील ढाळे पिंपळगाव, पिंपरी(सा)मळेगाव, साकत, महागाव, बावी, उपळे, जामगाव परिसरात गेले 10 ते 12 दिवस मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबिन व उडीदाच्या शेंगांना नव्याने कोंब फुटले आहेत. 

हेही वाचाः मामा म्हणाले स्पर्धा परिक्षेसाठी लई हुशारी लागतीया, तुझ्याच्याने होणार नाही ! मात्र जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने मिळवली मोठी पोस्ट 

अगोदरच गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.तर दुसरीकडे अतिवृष्टीसारखं आस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.तालुक्‍यातील उपळे,नारी, पानगाव मंडल क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सोयाबिन उडीद, कांदा ऊस पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले सोन्यासारख पीक पावसाच्या तडाख्यात मातीमोल झालं आहे.ढाळे पिंपळगांव परिसरातील शेतकरी जयंत काशीद,दशरथ काशीद,नितीन काशीद,सुनील वायकर,काकासाहेब काशीद,मारुती काशीद,नानासाहेब काळे,भारत काटमोरे,राजेंद्र मोरे,प्रमोद मोरे यांच्या शेतातील सोयाबिनचे पीक काळे पडून त्यास नव्याने कोंब फुटू लागले आहेत.शेतकऱ्यांनी जड अंतकरणाने खरीप पिकांच्या काढणीला सुरुवात केली आहे मात्र पावसाचा मुक्काम काय पुढे सरकायला तयार नाही.तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शुक्रवार व शनिवार सलग दोन दिवस पावसानें हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा पुरता धास्तावला आहे. 

हेही वाचाः मोहोळचे उपनगराध्यक्ष तलफदार यांचा राजीनामा ; भावी उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे डोके यांच्या नावाची चर्चा 

शेतकरी जयंत काशीद यांनी कृषि विभाग,संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ पातळीवरून आम्हाला पंचनामे व पाहणी करण्यासाठी कोणतेही आदेश आले नाहीत त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाहीत असे सांगण्यात आले.जेव्हा वरीष्ठ पातळीवरून आदेश येथील तेव्हा आम्ही पाहणीसाठी पंचनामे करण्यासाठी येऊ असे उत्तर मिळत आहे.सोयाबिनच्या शेंगाला कोंब फुटू लागल्याने व सडू लागल्याने शेतकऱ्यांनी गुडगाभर पाण्यातून काढणीला सुरुवात केली आहे. 

शासनाने नुकसानभरपाई द्यावी 
मळेगांव,ढाळे पिंपळगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन उडीद पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीन काळे पडून त्यास नव्याने कोंब फुटू लागले आहेत.अगोदरच दुबार पेरणीचे संकट आणि आता अतिवृष्टीचे संकट यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.शासनाने सरसकट नुकसानभरपाई देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा. 
- दशरथ काशीद सोयाबिन उत्पादक शेतकरी  

 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sprouted sprouts to soybeans; Rain damage during AN harvest