नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करा, मुख्यमंत्र्यांकडे कोणी मागणी केली वाचा

Start buying onions on behalf of NAFED in Karmala
Start buying onions on behalf of NAFED in Karmala

करमाळा (सोलापूर) : कांद्याचे दर कोसळल्याने करमाळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून 50 हजार मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी करमाळा तालुक्यातील शेतकरी मोठया प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न घेतात. लागवड केलेली आहे. सध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतक-यांखर्च ही निघत नाही, अशी परिस्थिती कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांद्यास १ रूपये २ रूपये किलो दराने प्रमाणे दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी जाहीर केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍याचा माल विक्रीविणा पडून आहे. कोरोनामुळे नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून कांदा खरेदी करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.करमाळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक-यांसाठी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करणे गरजेचे आहे. माञ केंद्र शासनाने घोषणा करून दो आठवडे झाले तरी अद्यापही याकडे कुणी लक्ष दिले नाही. त्यातच सोलापूर शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने बाजार समिती बंद आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा कांदा विक्री झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन त्याची उपासमार होत आहे.  करमाळा तालुक्यामध्ये कांदा पिकाचे प्रमाण व सोलापूर जिल्हाचे ठिकाणाचे अंतर १४० कि.मी.पेक्षा जास्त असल्याने नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकर्‍यांची गैरसोय दूर होणार आहे.

करमाळ्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरु करा
तीन महीन्यापुर्वी 15 हजार पर्यंत कांद्याला भाव मिळाला. आज तोच कांदा 2 ते 5 रूपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे शेतक-यांचा कांदा लागवडीचा खर्च ही निघू शकत नाही. केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून 50 हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी करायचे ठरवले आहे. महाराष्ट्रातुन मोठ्याप्रमणावर कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे करमाळा येथे नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आपण केली आहे, असे माजी आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com