परिचारकांच्या आधी औदुंबरआण्णांचा पुतळा उभारावा : अमरजित पाटील यांची मागणी 

अभय जोशी
Sunday, 4 October 2020

यासंदर्भात श्री. पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पंढरपूर शहरामध्ये माजी आमदार परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय सत्ताधारी भाजप आणि पंढरपूर विकास आघाडीने घेतला आहे. पंढरपुरातील नव्याने होणाऱ्या नामसंकिर्तन सभागृहास माजी आमदार परिचारक यांचे नाव देण्याचाही ठराव मंजूर केला आहे. दोन्ही ठराव व सर्वसाधारण सभा पार पडत असताना विरोधी आमदार भारत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एकही नगरसेवक सभेस उपस्थितीत नव्हते. याबाबत आमदार भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुन सदर बैठक व बैठकीमधील करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची मागणी केल्याचे समजते. 

पंढरपूर(सोलापूर) ः जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभा करावा. परंतू, त्याआधी पंढरपूर तालुक्‍याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपुरातील सरगम चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी केली आहे. 

हेही वाचाः धाराशिव साखर कारखाना देणार उसाला चांगला भाव 

यासंदर्भात श्री. पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पंढरपूर शहरामध्ये माजी आमदार परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय सत्ताधारी भाजप आणि पंढरपूर विकास आघाडीने घेतला आहे. पंढरपुरातील नव्याने होणाऱ्या नामसंकिर्तन सभागृहास माजी आमदार परिचारक यांचे नाव देण्याचाही ठराव मंजूर केला आहे. दोन्ही ठराव व सर्वसाधारण सभा पार पडत असताना विरोधी आमदार भारत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एकही नगरसेवक सभेस उपस्थितीत नव्हते. याबाबत आमदार भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुन सदर बैठक व बैठकीमधील करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची मागणी केल्याचे समजते. 

हेही वाचाः शेतीत अडचणी येणारच; हारायच नाय...म्हणत त्यांनी केली आत्महत्या 

महत्वाचे म्हणजे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होणार असल्याचा अजेंडा नगरसेवकांना दिल्याचे समजते. सत्ताधारी भाजप-पंढरपूर विकास आघाडीने विरोधी आमदार भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवत सभागृहात आपल्या नगरसेवकांना उपस्थितीत ठेवत सर्वसाधारण सभा पार पाडली व त्यामध्ये वरील ठरावांसह अन्य ठराव मंजूर केले. भाजप-पंढरपूर शहर विकास आघाडीची सदर कृती आणि कामकाज बेकायदेशीर आहे. याबाबत जिल्हाधिकारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तक्रारीवर काय निर्णय घेतात हा प्रश्‍न आहे. आमदार भालके या विषयात किती लक्ष घालतात कि नेहमीप्रमाणे मिलीभगतचे राजकारण करतात हे सर्व येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पंढरपुरातील नियोजित नामसंकिर्तन सभागृहास माजी आमदार परिचारक यांचे नाव देणे योग्य होणार नाही. श्रीमंत परिचारक यांचा आणि कला क्षेत्राचा काही संबंध येत नाही. त्यांच्या नावाऐवजी पंढरपुरातील नामवंत कलावंत लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांचे नाव सदर नामसंकिर्तन सभासगृहास देणे योग्य ठरेल. कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार भारत भालके यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही श्री पाटील यांनी केली आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A statue of Audumbar Anna should be erected before the attendants: Demand of Amarjit Patil