ओऽ जर्मन शेफर्डचं पिल्लू केवढ्याला? : हास्यसम्राट दीपक देशपांडे 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 1 April 2020

कारल्याची पेस्ट घालून चपाती खायला देऊन एप्रिल फूल करायचं, की रवासाखरेच्या शिऱ्यात तिखट टाकून, की आइस्क्रीमच्या गोळ्याच्या आत मिरची भजी ठेवायची... असे काहीसे प्रकार करावे लागतील. बाथरूममध्ये पाय घसरून पडण्याची ऍक्‍टिंग केली तर कोणी दवाखान्यात पण नेणार नाही. एकूण काय तर या वर्षी पाकळ्या नसलेल्या फुलांचा नुसतंच देठ असलेला एप्रिल फूल आलाय नशिबाला.

सोलापूर : व्हॅलेंटाइन डे ज्या प्रमाणात साजरा होण्याची शक्‍यता असते त्या प्रमाणात एप्रिल फूल साजरा होत नाही. पण सध्याचे दिवस विचित्र आहेत. "कोरोना' नावाच्या एका अपरिचित विषाणूने एप्रिल येण्याआधीच जगाला फूल करून घरात बंदिस्त केले आहे. सगळेच घरात बंदिस्त असल्याने एप्रिल फूलचा खेळ खेळायचा कसा, हा एक प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा : पालकमंत्र्यांची उचलबांगडी सोलापूर कॉग्रेस आडचणीत 

कारल्याची पेस्ट घालून चपाती खायला देऊन एप्रिल फूल करायचं, की रवासाखरेच्या शिऱ्यात तिखट टाकून, की आइस्क्रीमच्या गोळ्याच्या आत मिरची भजी ठेवायची... असे काहीसे प्रकार करावे लागतील. बाथरूममध्ये पाय घसरून पडण्याची ऍक्‍टिंग केली तर कोणी दवाखान्यात पण नेणार नाही. एकूण काय तर या वर्षी पाकळ्या नसलेल्या फुलांचा नुसतंच देठ असलेला एप्रिल फूल आलाय नशिबाला. सगळेच घरात असल्याने एप्रिल फूलचे किस्से सांगण्यात 2 एप्रिल कधी येईल सांगता येत नाही. सध्या "दिवस मोजण्याचे दिवस' आहेत म्हणून दवाखान्यात ऍडमिट असलेल्या पेशंटसारखी प्रत्येकाची अवस्था झालीय. पण त्यातही मनोरंजन शोधून थोडी मजा करण्याची आपली सोलापुरी शैली आहे. कारण आयसीयूमध्ये लिव्हरफेल झालेल्या मित्राला "दारू पिताना लई मजा वाटत होती ना बे तुला. मग भोग फळ' असे स्पष्टवक्ते मित्र सोलापुरीच असू शकतात. हा तर काय सांगत होतो, एप्रिल फूऽऽलचा किस्सा... 
आटपाट नगर होतं. त्या नगरात एक मित्र होता. सकाळी सकाळी दहा वाजता त्याचा लॅंडलाइनचा फोन वाजला. (ज्याकाळी लॅंडलाइन होतं तेव्हाची गोष्ट). मित्राने फोन उचलला. पलीकडून प्रश्‍न... 

हेही वाचा : जवळच्या दुकादाराला संभाळा, तो तुम्हाला संभाळेल 

मित्र : नमस्कार, बोला. 
हा टिंब टिंब नंबर आहे ना? 
मित्र : हो बोला. 
आपल्याकडे जर्मन शेफर्डची पिल्लं आहेत ना विकायला. 
मित्र : नाही हो. 
दुसरा फोन... 
मित्र : बोला. 
ते जर्मन शेफर्डचं पिल्लं आहेत ना विकायला? 
मित्र : ओ नाई ओ... माझ्याकडं पिल्लं आहेत म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? बंद करा फोन. 
तिसरा फोन 
ओऽऽ ते जर्मन शेफर्डचं पिल्लू केवढ्याला? 
मित्र : अरे नाई म्हणून सांगायलो तरी फोन करायलाव. कसले पिल्लू बिल्लू काय नाई. 
यामधला 25 फोन... 
ओ मालक ते जर्मन शेफर्डचं पिल्लू केवढ्याला? 
मित्र : जर्मन शेफर्डचं पिल्लू... अरे कुत्र्या कोणाला फोन लावतो रे... तुझा बाप का माझ्या घरात कुत्री सोडून गेला होता का? आता मला विचारायला लागला पिल्लू देता का म्हणून... तू कुठं राहतो सांग तुझ्या घरात डुकराची पिल्लू सोडतो बे 
पलीकडला आवाज : अरे पेपरला जाहिरात देता अन्‌ वरनं शिव्या देता का? चांगलाय धंदा... नीट बोलायचं नशील तर जाहिरात देऊन झक कशाला मारायचं? 
मित्रानं फोन बंद केला आणि ज्या पेपरमध्ये जाहिरात आली त्या ऑफिसमध्ये गेला. जाहिरात विभागात जोरात ओरडून दंगा केला. 
"सकाळपास्नं फोन यायलेत कोण दिलेत जाहिरात...' याची चौकशी केली तर माहिती मिळाली, एका मित्राने स्वत: पैसे खर्च करून ही जाहिरात दिली होती. 
आता मित्र पण असा होता, त्याला हा जाबही विचारू शकत नव्हता. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of Deepak Deshpande Aprilfull