‘या’ व्हिडीओमुळे शरद पवार यांच्या जुन्या राजकीय आठवणींना उजाळा : Video

अशोक मुरुमकर
Wednesday, 17 June 2020

माजी उपमुख्यंमत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील इतर काही प्रमुख नेत्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचा हा व्हिडीओ असून चांगलाच चर्चेत आला आहे.

सोलापूर : माजी उपमुख्यंमत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील इतर काही प्रमुख नेत्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचा हा व्हिडीओ असून चांगलाच चर्चेत आला आहे. नेमका कोणत्या हॉटेलमधील व कोणत्या कालावधीतील हा व्हिडीओ आहे हे सांगता येत नसले तरी यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सोलापूरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते. यासाठी त्यांना काही तालुक्यात तडजोड करावी लागत होती. काही तालुक्यात स्थानिक नेते आपापला गट प्रबळ करत होते. सांगोल्यात शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वर्चस्व होते. तर करमाळा तालुक्यात जगताप गट प्रबळ होता. शेकापचे माजी आमदार देशमुख व विजयसिंह मोहिते पाटील हे वरच्या राजकारणात कोणत्याही पक्षात असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांना धरुन होते.

तेव्हा शरद पवार यांचे जिल्ह्यावर विशेष लक्ष असत. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ १९९० चा असल्याचे सांगितले जात आसून यावर ९० चे सोलापूर जिल्यातील राजकारणी मंडळी असं म्हटलं असून विजयसिंह दादा, गणपत आबा देशमुख इत्यादी मान्यवर आहेत. तेव्हा शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. तर गणपतराव देशमुख हे शेकापमध्ये.
हेही वाचा : ‘या’ नेत्याने सांगितले अन्‌ उजनी धरणाची जागा बदलली; खरी जागा तुम्हाला माहितेय का? 
कृषीरत्न आनंद कोठडीया म्हणाले, शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांचा एकमेकांवर विश्‍वास होता. मात्र त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते असं अनेकदा जाणवत होते. तेव्हा जिल्ह्याची सर्व सुत्रे ही विजयसिंह मोहीते पाटील यांच्याकडे होती. मात्र, सांगोल्यात सुरुवातीपासून शेकापची सत्ता होती. तिथे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वजन होते. तेथील जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक, पंचायत समिती यासह बहुसंख्य पदेही देशमुख यांच्याकडेच होती. तेव्हा जिल्ह्याची सुत्रे हाती असलेले मोहिते पाटील यांना सांगोल्यात तडजोड करावी लागत होते. अनेक पदे त्यांनी सांगोला तालुक्यात बिनविरोध द्यावी लागत होती. तेव्हा शरद पवार हे जिल्हात जे काय करायचे ते मोहिते पाटील यांनाच विचारुन करत होते.
राजकीय अभ्यासक नागनाथ माने म्हणाले, १९९० च्या दरम्यान सहकारी संस्था चांगल्या चालत होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकाराची जिल्ह्यात मुर्हत मेड रोवली होती. त्यावेळी राष्ट्रीयकृत बँका जास्त नव्हत्या. तेव्हा गाव पातळीवर असलेल्या सोसायट्या जिल्हा बँकेला जोडल्या होत्या. गावात राजकीय नेतृत्व म्हटलं तर सरपंच आणि आर्थिक दृष्टा जर विचार केला तर सोसायटीच्या चेअरमनला खूप महत्त्व होते. तालुका पातळीवर आमदाराला जेवढी किंमत होती तेवडीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिल्हा बँकेच्या संचालकाला किंमत होती. त्यावेळचा काळ जिल्हा बँकेसाठी सुवर्णकाळ होता. पूर्वी जिल्ह्यात मोहिते पाटील व करमाळ्याचे स्व. नामदेवराव जगताप एकमेकांच्या विरुद्ध होते. तेव्हा नामदेवराव जगताप यांचा गट प्रभावी होता. सुरुवातीला स्व. शंकारराव मोहिते पाटील हे शेकापमध्ये होते. पण नंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भोवती जिल्ह्याचे राजकारण फिरत होते. तेव्हा गणपतराव देशमुख व मोहिते पाटील एकमेकांच्या विचाराचे होते. ते एकमेकांचा मानसन्मान करत होते. गणपतराव देशमुख हे तत्वनिष्ट होते. पण जिल्ह्यात त्यांचा गट प्रबळ नव्हता. सांगोल्यात त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवले. तेव्हा जिल्ह्यात मोहिते पाटील यांच्याकडे सगळी सुत्रे असली तरी सांगोल्यात गणपतराव देशमुख यांची मदत घ्यावी लागत होती. आणि आता व्हिडीओ व्हायरल होत आहे नेमका तो त्याच कालावधी असण्याची शक्यता आहे. त्यात माजी आमदार गणपतराव देशमुख, विजयसिंह मोहीते पाटील यांच्यासह माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार सुधाकर परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव डोबळे, माजी आमदार भाई एसएम पाटील आहेत.

हेही वाचा : शरद पवारांनी लक्ष घातले अन्‌ ‘या’ जिल्ह्यातील विजेचा प्रश्‍न सुटला; काय आहे पत्र वाचा
माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे सध्या वय झाले आहे. व्हिडीबाबत त्यांना विचारले असता मला व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत सांगता येणार नसल्याचे सांगितले. मी तो व्हिडीओ पाहिला नसून सध्या मला एवढं दिसत नसल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story in solapur district Sharad pawar Vijaysinh Mohite patil and Ganpatrao Deshmukh politics