स्वत: स्वावलंबी बनून इतर महिलांचे संसार उभे करण्यासाठी धडपड 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 18 October 2020

निर्मला शंकर शिंदे या कुमठा नाका परिसरात राहतात. पाच वर्षापूर्वी अचानक एक दिवस त्यांच्या पतीचे काम सुटले. तेव्हा काही तरी करावे म्हणून त्या आसरा चौकात कामाच्या शोधात फिरत गेल्या. तेव्हा त्यांना कडक भाकरी करण्याचे काम मिळाले. त्यांनी ताबडतोब घरी येऊन हे काम पूर्ण केले. मग त्यांनी इतर काही हॉटेलात कडक भाकरीचे काम मिळवले. सुरवातीला एकटीने काम करताना हॉटेलच्या ऑर्डर वाढत गेल्या. तेव्हा त्यांनी परिसरातील त्यांच्या शेजारणींना कामात सहभागी करून घेतले. त्यांच्या घरीच कडक भाकरी तयार करून त्याचे पॅकिंग त्या संबंधितांना नेऊन देउ लागल्या. कडक भाकरीची गुणवत्ता पाहून कौतुक करणाऱ्या ग्राहकांना हॉटेलचालक त्यांचा मोबाईल नंबर देत असल्याने त्यांची ऑर्डर वाढली. 

सोलापूरः एक दिवस कामाच्या शोधात निर्मला शिंदे या बाहेर पडल्या असताना कडक भाकरीचे एक काम मिळाले. त्यांनी कडक भाकरी, स्वयंपाक व आचाऱ्याच्यासोबत कामे करत असताना पन्नासपेक्षा अधिक महिलांना संसाराच्या ओढग्रस्तीतून बाहेर काढत छोटे मोठे रोजगार मिळवून दिले. एक पैशाची अपेक्षा न बाळगता प्रत्येकीला कष्टाचा मोबदला मिळवून देण्याची धडपड महिलांना दिलासा देणारी ठरली. या प्रयत्नातून मुलीची लग्ने, घरे, मुलींची बाळंतपणे व संसारातील आर्थिक संकटाची सोडवणूक करण्याचे काम आजही त्या उत्तम पध्दतीने करत आहेत. स्वत:बरोबरच अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

हेही वाचाः अल्पवयीन मुलांना अत्याचार व हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी 

निर्मला शंकर शिंदे या कुमठा नाका परिसरात राहतात. पाच वर्षापूर्वी अचानक एक दिवस त्यांच्या पतीचे काम सुटले. तेव्हा काही तरी करावे म्हणून त्या आसरा चौकात कामाच्या शोधात फिरत गेल्या. तेव्हा त्यांना कडक भाकरी करण्याचे काम मिळाले. त्यांनी ताबडतोब घरी येऊन हे काम पूर्ण केले. मग त्यांनी इतर काही हॉटेलात कडक भाकरीचे काम मिळवले. सुरवातीला एकटीने काम करताना हॉटेलच्या ऑर्डर वाढत गेल्या. तेव्हा त्यांनी परिसरातील त्यांच्या शेजारणींना कामात सहभागी करून घेतले. त्यांच्या घरीच कडक भाकरी तयार करून त्याचे पॅकिंग त्या संबंधितांना नेऊन देउ लागल्या. कडक भाकरीची गुणवत्ता पाहून कौतुक करणाऱ्या ग्राहकांना हॉटेलचालक त्यांचा मोबाईल नंबर देत असल्याने त्यांची ऑर्डर वाढली. 

हेही वाचाः अजित पवार फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री, मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा 

शेजारी असलेल्या अनेक महिला शहरातील दूर भागात पायी जाऊन धुणीभांडी करण्याचे काम शोधत असत. अनेक महिलांना कामही मिळत नव्हते. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबात लहान मुलांचे संगोपन, आजारपण अशा अनेक गोष्टीसाठी पैशाची गरज भागत नव्हती. कडक भाकरीच्या कामात त्यांनी शेजारी असलेल्या महिलांना कामे वाटून दिली. त्यामुळे मजुरीची रक्कम प्रत्येकीला मिळवता आली. महिन्याकाठी हे काम वाढतच गेले. त्यामुळे परिसरातील महिलांची कामासाठीची वणवण थांबली. हे काम शिकत असताना त्यांना पैशाची बचत व कमाईची जाणीव झाली. कधी मुलीची लग्ने, बांळतपण व घरातील सदस्यांचे आजारपण यासाठी आर्थिक आधार महिलांना मिळु लागला. 
दुसरीकडे कामाच्या ऑर्डर मिळवताना अधुनमधून स्वयंपाकाच्या कामाची मागणी त्यांना मिळू लागली. हॉटेलमध्ये भाज्या व पदार्थ कसे करतात हे त्या शिकत होत्या. लग्नसोहळ्यातील स्वयंपाकाच्या आर्डर आचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या हाताखाली काही महिलांना घेऊन त्यांनी स्वयंपाकाची कामे सुरू केली. अनेक प्रकारच्या भाज्या आचाऱ्याप्रमाणे सारख्या चवीचे करणे त्यांना जमले. मोठ्या कामे घेणारे आचारी त्यांना महिलांचा ग्रुप आणणे, वेळेत स्वयंपाक करून घेणे आदी कामे विश्‍वासाने सोपवत होते. त्यांनी उत्तरप्रदेश व बिहारच्या आचाऱ्यांच्या स्वयंपाकाची नविन पद्धती शिकून घेतल्याने हे आचारी त्यांच्या हातावरील स्वयंपाकाच्या कामासाठी बोलावून घेऊ लागले. या सर्व कामातून पन्नासपेक्षा महिलांना वर्षातील बहुतांश दिवस रोजगार मिळू लागला. अगदी लॉकडाउनमध्ये देखील त्यांनी चार विवाह सोहळ्याचे स्वयपांकाचे काम मिळवले. कोणत्याही स्थितीत दिलेले काम पूर्ण करायचे व काम करणाऱ्या महिलांना काम वाटून देण्याची शिस्त त्यांनी कायम ठेवली आहे. 

कामामध्ये सर्वाचा वाटा 
अत्यंत गरजू असलेल्या महिलांना सोबत घेत नियमित ऑर्डर घेण्यास सुरवात केली. नियमित संपर्क, वेळेत ऑर्डर पूर्ण करणे हे महत्त्वाचे समजून त्यांनी या कामात खंड पडू दिला नाही. दररोज शंभर किंवा दोनशेपर्यंत भाकरीची ऑर्डर मिळवून त्या शेजारील महिलांमध्ये काम वाटून देते. 
-निर्मला शिंदे, स्वागत नगर, कुमठा नाका सोलापूर 

ठळक बाबी 
कडक भाकरी व्यावसायापासून उद्योगाची सुरवात 
स्वयंपाकाच्या कामातून 50 महिलांना रोजगार 
महिलांची आर्थिक संकटातून मुक्तता व साधली प्रगती 
रोजगारातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggling to become self-reliant and stand up for other women