"अंतिम' परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची डमी चाचणी ! "एवढ्या' विद्यार्थ्यांशी संपर्क होईना 

तात्या लांडगे
Tuesday, 15 September 2020

अंतिम वर्षाची परीक्षा 5 ते 29 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. तत्पूर्वी, विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून ऑनलाइनची साधने उपलब्ध आहेत तथा नाहीत, याची माहिती मागविली आहे. त्याची मुदत मंगळवारपर्यंतच आहे. आतापर्यंत एकूण 75 हजार परीक्षार्थींपैकी 50 हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या माध्यमातून परीक्षेचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार सुमारे 68 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तर 32 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी संलग्नित 108 महाविद्यालयांमधील सुमारे 74 हजार 927 विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने त्यांची घरबसल्या परीक्षा घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला. त्यानुसार या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात माहिती देण्याच्या हेतूने संपर्क केला जात आहे. मंगळवारपर्यंत (ता. 15) या सर्व विद्यार्थ्यांनी पर्याय निवडावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप 25 हजार विद्यार्थ्यांनी काहीच पर्याय निवडलेला नाही. राज्यातील बहुतेक विद्यापीठांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी : राज्यातील साडेसात लाख रुग्णांची कोरोनावर मात; सोलापुरातील मृत्यूदर झाला कमी 

अंतिम वर्षाची परीक्षा 5 ते 29 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. तत्पूर्वी, विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून ऑनलाइनची साधने उपलब्ध आहेत तथा नाहीत, याची माहिती मागविली आहे. त्याची मुदत मंगळवारपर्यंतच आहे. आतापर्यंत एकूण 75 हजार परीक्षार्थींपैकी 50 हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या माध्यमातून परीक्षेचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार सुमारे 68 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तर 32 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र, अद्याप 25 हजार विद्यार्थ्यांनी कोणताच पर्याय निवडला नसल्याने विद्यापीठाला पुढील नियोजनास अडचणीत येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वी सर्वच महाविद्यालयांना पत्र पाठवून त्या विद्यार्थ्यांकडून पर्याय मागवून घ्या, असे सूचित केले आहे. 

हेही वाचा : "माणिकचमन' या द्राक्ष वाणाचे निर्माते त्र्यंबक तात्या दबडे 

परीक्षेपूर्वी होईल डमी चाचणी 
यंदा कोरोनामुळे प्रथमच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय ठरला. मात्र, अनेकजण या नवप्रणालीपासून चार हात लांबच आहेत. त्यांना परीक्षा देताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विद्यापीठाकडून डमी चाचणी घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याच्या मार्गदर्शनासाठी विद्यापीठाकडून एक व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठविला जाणार आहे. डमी चाचणीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींवर प्रश्‍न दिले जाणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. 

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पर्याय निवडावा 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा म्हणाले, एटीकेटी तथा बॅगलॉग विद्यार्थ्यांना 35 तर नियमित विद्यार्थ्यांसाठी बहुपर्यायी 50 प्रश्‍न दिले जातील. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा सोयीच्या महाविद्यालयांमध्ये (क्‍लस्टरमध्ये) घेतली जाईल. त्यांना परीक्षेपूर्वी काही तास अगोदर हजर राहावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन की ऑफलाइन यापैकी कोणताच पर्याय निवडलेला नाही, त्यांनी तो तत्काळ निवडावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students were not contacted for the final year dummy test