पोलिस अधीक्षकांचा जिल्ह्यातील हालचालींवर "कंट्रोल' ! विजेत्यांकडून मिरवणुका नाहीत, जल्लोष मात्र सुरूच 

tejaswi_satpute
tejaswi_satpute

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा पार पडला असून तब्बल 658 पैकी 587 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली आहे. आज मतमोजणी सुरू असून मतदानादिवशी सुमारे 25 गावांमध्ये वादाचे प्रसंग घडल्याने त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 75 ते 80 संवेदनशील गावांमध्येही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूममधून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवून आहेत. 

विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. कोणत्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्‍स विनापरवाना लावू नयेत, असेही आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर 66 वाहने घेऊन पोलिस गावोगावी पेट्रोलिंग करीत आहेत. दुसरीकडे, तब्बल दोन हजार 900 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडून सातत्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जात आहेत. पराभवानंतर संबंधितांनी पराभव स्वीकारून गप्प बसावे. विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणुका काढू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सकाळी साडेआठ वाजल्यापासून अद्याप एकाही ठिकाणी वाद झालेला नाही, असे झेंडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कुठेही घडली नाही वादाची घटना 
जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. बहुतांश गावांमधील चित्र स्पष्ट झाले असून अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्‍का बसला आहे. तर काही गावांमध्ये परिवर्तन होऊन सत्ता युवकांच्या ताब्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनपेक्षितपणे पराभवाचा धक्‍का बसलेल्यांची संख्या मोठी आहे. पराभूत उमेदवार व विजयी उमेदवारांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर गावोगावी विशेषत: संवेदनशील गावांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर कंट्रोल रूममधून वॉच ठेवून आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून अद्याप कोणत्याही ठिकाणी वादाची घटना घडलेली नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com