"क्‍लासमेंटस्‌' झटताहेत कोरोनाचा भूकबळी होऊ नये म्हणून

Support through the WhatsApp group in Karmala
Support through the WhatsApp group in Karmala
Updated on

करमाळा (सोलापूर) : "व्हाट्‌सऍप"ने जगातील सर्वांनाच एकत्र बांधून ठेवण्याचे काम केले आहे. या ऍपच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, वसतिगृह, क्‍लासेस, गावे, तालुके, जिल्हे, संस्था, कंपन्या, नेते, मंडळे आदी ठिकाणच्या मंडळींना सुख, दुःख, आनंद, तक्रारी, प्रसिद्धी, बातम्या, गप्पा, गोष्टी आदी कारणांसाठी एकत्र आणले आहे. या व्हाट्‌सऍपचे जेवढे तोटे तेवढेच फायदे आहेत. व्हाट्‌सऍपवरील चर्चेने कित्येक वेळा दोन मित्रांत घट्ट मैत्री होते किंवा कधीकधी वितुष्ठ येते. व्हाट्‌सऍपद्वारे अफवेने आपण दोन गटांत, जातीत किंवा धर्मात तेढही निर्माण झालेला पाहिला असेल.

सद्यस्थितीत कोरोना काळात अफवा पसरून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशा कारणाने तर व्हाट्‌सऍप वापराचे नियम बनवण्याची वेळ प्रशासनावर आल्याची आपण पाहतो आहोत. यासर्वांवर मात करत करमाळ्यातील उच्चशिक्षित युवकांच्या "क्‍लासमेंट्‌स' नावाच्या ग्रुपने कोरोना व्हायरसने असलेल्या लॉकडाउन काळात समाजकार्याचा आदर्श निर्माण केला आहे. 
"क्‍लासमेंट्‌स' नावाने कार्यरत असलेला उच्चशिक्षित तरुणांचा व्हाट्‌सऍप ग्रुप "कोविड- 19'च्या जागतिक महामारीविरुद्धच्या लढ्यात समाजाच्या मदतीसाठी धावून आला. या ग्रुपने करमाळा शहरातील विविध भागांत गरीब व गरजू कुटुंबांना गृहोपयोगी किराणा किट्‌सचे वाटप केले. करमाळातील मौलाली माळ व सुमंतनगर येथील रहिवाशांना वाटप करण्यात आले. 
हेही वाचा : लॉकडाउन : रोजची मजुरी 300 ते 600; सरकारकडून फक्त 46 रुपये अर्थसहाय्य
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र व राज्य सरकारने त्यासंदर्भात घेतलेला लॉकडाउन निर्णयचा परिणाम करमाळ्यातील गोरगरीब व रोजंदारीवर उदरनिर्वाह असणाऱ्या कटुबांवर झालेला ग्रुपच्या काही सदस्यांना दिसला. त्यानंतर समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रुपकडून काही करता येऊ शकते का? यासंदर्भात ग्रुपवर चर्चा करण्यात आली. किराणा किट्‌सच्या वाटपसंदर्भात ग्रुपमधील सदस्य सकरात्मक असल्याचे दिसून आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी करमाळा येथील शिवाजीनगर येथे "क्‍लासमेंट्‌स' या ग्रुपचे सदस्य असलेले अभिजित अडसूळ यांच्या घरी सुरक्षित अंतर राखून बैठक घेऊन सीए लहू काळे, संदीप चुंग व नवीनशेठ मुथा यांच्या विचाराने व नियोजन ठरवण्यात आले. बैठकीत उपक्रमातील किराणा किट्‌स वाटपसंदर्भातले निर्णय घेण्यात आले. सदर उपक्रमासाठी तहसीलदार समीर माने व तिजोरे यांच्याशी चर्चा करून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने व यांच्या कार्यालयाने पुरविलेल्या यादीनुसार मौलाली माळ व सुमंतनगर येथील गरीब, गरजू कुटुंबे व ग्रुप सदस्यांचा संपर्कातील गरीब गरजू कुटुंबांना या व्हाट्‌सअूप ग्रुपच्या सहकार्यातून मदतीचा हात दिला. 
हेही वाचा : भारतरत्न इंदिरानगरातील कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील 47 जणांची कोरोना चाचणी
किराणा किट्‌स वाटपाचा उपक्रम पूर्णत्वास नेण्यास ग्रुप ऍडमीन विक्रांत लष्कर, अमर करंडे, रमेश किरवे, प्रतीक दोशी, नारायण शहाणे, महेश परदेशी, किरण पाटील, हनुमंत ढेरे, अभिजित मिरगणे, अभिजित बदे, योगेश टोणपे, नितीन चांदगुडे, अतुल बागडे, महेश शिंगाडे, सुमेध भोसले, निकेश घाडगे, मंगेश सूर्यपुजारी, शशांक दिवाण, अकिब शेख, नीलेश गायकवाड, संदेश राऊत, भरत खेडकर, विशाल मस्कर व योगेश कवडे यांचे देणगी स्वरूपात मोलाचे योगदान लाभले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com