
सोलापूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सोलापूर आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शरद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई पोलिस संघाने सोलापूर ऍकॅडमी संघावर विजय मिळवत शरद चषक पटकाविला.
सोलापूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सोलापूर आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शरद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई पोलिस संघाने सोलापूर ऍकॅडमी संघावर विजय मिळवत शरद चषक पटकाविला.
पारितोषिक वितरण समारंभ
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, आयोजक किशोर माळी, स्पर्धा प्रमुख प्रशांत बाबर, माजी महापौर नलिनी चंदेले, विनोद भोसले, सुभाष राऊत आदी उपस्थित होते. या वेळी पंकज भुजबळ, महेबुब शेख, सक्षणा सलगर यांनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा- विदर्भ मुलांचा संघ करणार आणखी एक विक्रम
अंतिम सामना मुंबई पोलिस व सोलापूर ऍकॅडमी
अंतिम सामन्यात मुंबई पोलिस संघ एकहाती सोलापूर ऍकॅडमी संघावर विजय मिळवत शरद चषक व एक लाख रुपयांचा मानकरी ठरला. प्रथम सोलापूर ऍकॅडमीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 17.1 षटकांत सर्वबाद 95 धावाच करू शकला. निखील मादास 19, राजेश येमूल 14, हणमंतु पुजारीने 13 धावा केल्या. मुंबई पोलिस संघाकडून पुष्कराज चव्हाणने 22 धावांत सहा बळी, सागर मुळेने 19 धावांत दोन बळी घेतले. मुंबई पोलिस संघाने 95 धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबई पोलिस संघाने 14.1 षटकांत पाच बाद 96 धावा केल्या. मुंबई पोलिस संघाकडून पुष्कराज चव्हाणने 49, स्वप्नील कुळेने 41 धावा केल्या. सोलापूर ऍकॅडमी संघाकडून सत्यजित जाधवने 15 धावांत दोन बळी, राजेश येमूल व सचिन चौधरी यांनी 1-1 बळी घेतले. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार पुष्कराज चव्हाण याला मिळाला. विजयी संघास एक लाख रुपये रोख, उपविजयी संघास 51 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या संघास 25 हजार रुपये व शरद चषक देण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप कुसेकर, विशाल कुलकर्णी, शंकर पवार, ग्यानबा सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे