esakal | शिक्षक बचत गटाने दिव्यांग मुलीला शिक्षणासाठी केली मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

apang madat.jpg

मोहोळ तालुक्‍यातील कामती केंद्रातील प्राथमिक शिक्षकाच्या श्री स्वामी समर्थ बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोचीकोरवे फार्महाऊसवर संपन्न झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील उद्योजक राजू पांढरे, उद्योजक हणमंत मदगोंडे उपस्थित होते. 

शिक्षक बचत गटाने दिव्यांग मुलीला शिक्षणासाठी केली मदत 

sakal_logo
By
श्रावण तिर्थे

कोरवली(सोलापूर): कामती केंद्रातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या स्वामी समर्थ बचत गटाने एका दिव्यांग मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेतल तीला आर्थिक मदत देऊ केली. 

मोहोळ तालुक्‍यातील कामती केंद्रातील प्राथमिक शिक्षकाच्या श्री स्वामी समर्थ बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोचीकोरवे फार्महाऊसवर संपन्न झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील उद्योजक राजू पांढरे, उद्योजक हणमंत मदगोंडे उपस्थित होते. 

हेही वाचाः नंदकुमार मुस्तारे यांचे कार्य दिर्घकाळ स्मरणात राहतील ः धर्मराज काडादी 

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बचत गटाच्या "गंगाजळी निधीतून" जळगाव येथील दिव्यांग मुलगी लक्ष्मी संजय शिंदे ही जन्मजात अपंग आहे. पण तिने जिद्दीच्या जोरावर बी .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण करून स्पर्धापरीक्षेची तयारी करते तसेच संपूर्ण लिखाण पायाने करते असा व्हिडीओ सोशल मीडियावर काही महिन्यापूर्वी व्हायरल झाला होता. 

हेही वाचाः बारा लाखाच्या शहरात 89 हजार टेस्ट ! आज 19 पॉझिटिव्ह अन तिघांचा मृत्यू 

हा व्हिडिओ बचत गटाचे अध्यक्ष अंकुश कुंभार यांच्या पाहण्यात आल्यानंतर त्यांनी मुलीशी संपर्क करून तिला कार्यक्रमात बोलावून सत्कार करून तिच्या पुढील शिक्षणासाठी पंधरा हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच हराळवाडी (ता. मोहोळ) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर नामदास यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या पत्नीला पंधरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष अंकुश कुंभार यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले बचत गटाने फायदा तोट्याचा विचार न करता सामाजिक भान ठेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. आमच्याकडून फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत करत आहोत. अशी भावना त्यांनी व्यक्त केली बचत गटाच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय भालेराव यांनी केले तर आभार रामचंद्र म्हमाणे यांनी मानले. यावेळी बचत गटाचे सर्व सभासद उपस्थित होते.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर