सत्यनारायण बोल्ली यांच्या नावाचा तेलुगू भाषिकांकडून आमदारपदासाठी आग्रह 

सत्यनारायण बोल्ली यांच्या नावाचा तेलुगू भाषिकांकडून आमदारपदासाठी आग्रह 

सोलापूरः राज्यपाल नियुक्त आमदार पदी कॉंग्रेस नेते सत्यनारायण ई.बोल्ली यांची निवड करण्याची मागणी येथे आयोजित तेलुगू भाषिकांच्या वतीने आयोजित सभेमध्ये करण्यात आली. 

शहरातील तेलुगू भाषिक कार्यकर्त्यांची सभा बोल्ली मंगल कार्यालयात बोलाविण्यांत आली. 

तेलुगू भाषिक लोक दिडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रात उदर निर्वाहा साठी विविध गावांत स्थायिक झाले. तेव्हा पासून आज पर्यंत समाज कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. कॉग्रेस पक्षाकडून अनेक नगरसेवक ,काही आमदार, खासदार होऊन सेवा केली. गत वीस पंचवीस वर्षापासून कॉंग्रेस पक्षाची स्थिती चांगली नाही. या परीस्थितीत ही तेलुगू समाज कॉग्रेस पक्षा सोबत आहे. परंतु तेलुगू समाजास पक्षाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे समाजाचे म्हणणे शासनाकडे मांडताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 
या बैठकीस अखिल भारत पद्मशाली संघम मुख्या. हैद्राबादचे बीसी, ओबीसी, एसबीसी विभागाचे चेअरमन अशोक इंदापुरे, पुर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त यल्लादास गज्जम, श्री मार्कंडेय रूग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलमारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, माजी अध्यक्ष पांडूरंग दिड्डी, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, नगर सेवक अविनाश बोमड्याल, सभेचे प्रमुख निमंत्रक अशोक आडम, किसन श्रीराम, रघुरामलु कंदीकटला, महांकाळ येलदी, पद्मशाली पदवीधर संघाचे अध्यक्ष अजय अन्नलदास सचिव यशवंत इंदापुरे, पद्मशाली पुरोहीत संघमचे अध्यक्ष नागदेव म्याना, हरीदास पोटाबत्ती, पुरूषोत्तम उडता, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल, व्यंकटेश आकेन,मल्लिकार्जून सरगम, श्रीरामदास,विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, राजू गुज्जा, पश्‍चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे स्वागत सचिव गणेश पेनगोंडा, पांडूरंग पुल्ली आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 
यावेळी एक समिती गठीत करून त्याव्दारे मा.श्री.सत्यनारायण ई.बोल्ली यांचे आमदार पदी राज्यपालांकडून नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.तसेच निवड होण्या साठी आवश्‍यक कामे आणि कागदपत्रांची पुर्तता आणि विविध बैठकांचे नियोजन करण्याचे ठरले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महांकाळ यलदी यांनी केले तर आभार काशिनाथ गड्डम यांनी मांडले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com