लाॅकडाउनच्या फावल्या वेळात त्यांनी फुलवली सुंदर बाग

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 18 जून 2020

आपला परिसर आपणच सुंदर व सुशोभित करणे, हे आपले कर्तव्य मानून पराग सोसायटीतील रहिवासी एकत्र आले. त्यांनी खड्डे खोदून वृक्षारोपण केले. बागेभोवती चालणे, फिरण्यासाठी गार्डनच्या आतील बाजूने ट्रॅक निर्माण केला. 

बार्शी(सोलापूर)ः येथील पराग इस्टेट सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येऊन खुल्या जागेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून सुंदर पराग गार्डनची निर्मिती केली आहे. स्वतःच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी सर्वजणांनी एकत्र येऊन लॉकडाउन कालावधीत हा उपक्रम राबवला आहे. 

हेही वाचाः ग्रहणात काय करावे, काय नाहीः वाचा सविस्तर 

आपला परिसर आपणच सुंदर व सुशोभित करणे, हे आपले कर्तव्य मानून पराग सोसायटीतील रहिवासी एकत्र आले. त्यांनी खड्डे खोदून वृक्षारोपण केले. बागेभोवती चालणे, फिरण्यासाठी गार्डनच्या आतील बाजूने ट्रॅक निर्माण केला. 

हेही वाचाः सदोष पर्जन्यमापन पध्दतीने शेतकऱ्यांना विमा भरपाईचा फटका 

दत्ता डोईफोडे यांच्या पाठिंब्यामुळे परिसरातील आबालवृद्धांनी एकत्र येऊन पराग गार्डन या सुंदर बागेची निर्मिती केली. बागेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची चांगला सोय झाली आहे. लोकवर्गणीतून चाललेले सुंदर बगीचाचे काम पाहून नगरसेवक नागेश दुधाळ, विजय चव्हाण यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मदत पुरवली. वृक्षसंवर्धन समितीचे उमेश काळे, अतुल पाडे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. त्यांनी विविध वृक्षांची रोपे दिली. बार्शी नगरपरिषदेचे गटनेते दीपक राऊत, लायन्स क्‍लबचे अमित इंगोले, रवी राऊत यांच्यासह पराग इस्टेटमधील महिलांसह मुलांनीही वृक्षारोपण केले. 
गार्डनमध्ये ट्रॅक, व्हॉलिबॉल ग्राउंड याही सुविधा निर्माण केल्या आहेत. झाडांना ठिबक सिंचनच्या साह्याने पाणीपुरवठा केला आहे. भविष्यात एक मंदिर व चाइल्ड पार्क बनविण्याचे नियोजन आहे. या बगीचा निर्मितीच्या कामासाठी परिसरातील नागरिक एकत्र येऊन त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. एक सुंदर बगीचा निर्माण झाल्याने बार्शीकर या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In their spare time, they planted a beautiful garden