आश्‍चर्यकारक ! 48 तासांत पोलिसांत एकही गुन्हा नाही 

तात्या लांडगे
बुधवार, 25 मार्च 2020

  • राज्यात चोरी, हाणामारी, घरफोडी, महिलांवरील अत्याचाराची एकही घटना नाही 
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या 144 कलमाशिवाय अन्य गुन्हाच दाखल नाही 
  • कोरोनाच्या भितीने गुन्हेगारांनी करुन घेतले स्वत:ला लॉकडाऊन 
  • नागरिक लॉकडाऊनमुळे घरी तर पोलिस रस्त्यांवर : गुन्हेगारांना मिळेना संधी 

सोलापूर : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी अथवा रस्त्यांवर, प्रवासादरम्यान चोरी करणाऱ्या चोरट्यांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. मागील 48 तासांत सोलापूरसह राज्यभरात कोरोनाशिवाय एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समोर आले आहे. सर्वजण कुटुंबासमवेत एकत्र असल्याचेही त्याला कारण असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! 14 एप्रिलपर्यंत रेल्वे बंदच : 26 हजार कोटींचा फटका 

राज्यातील शहरी व ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये एरव्ही दिसणारी फिर्यादी व गुन्हेगारांची वर्दळ आता कोरोनाच्या धास्तीने कमी झाली आहे. कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने रेल्वे, एसटी, खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आता 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे एरव्ही किरकोळ कारणावरुन तर कधी पैशाच्या देवाणघेवाणीवरुन तर कधी झटपट पैसे कमविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार घराबाहेर पडतात, असे पहायला मिळते. मात्र, आता कोरोनाच्या भितीने गुन्हेगारांनाही घरातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे पोलिसांचेही काम कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्याने राज्यातील चोरटे व गुन्हेगार घरातच बसून असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : उमेदवारीसोबत आता जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक 

कलम 144 व्यतिरिक्‍त एकही गुन्हा नाही 
देशातील कोरोना हा विषाणू हद्दपार करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांनीही ते निर्णय स्वीकारले असून त्यांनी घरातच राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे मागील 48 तासांत सोलापुरातील कोणत्याही पोलिस ठाण्यात कोरोनाशिवाय अन्य प्रकारचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

हेही नक्‍की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! पोलिस बंदोबस्तात होणार शेतमालांचे लिलाव 

ठळक बाबी... 

  • कोरोनाच्या भितीने गुन्हेगार स्वत:हून घरातच लॉकडाऊन 
  • मागील 48 तासांत कलम 144 अंतर्गत गुन्हे वगळता अन्य प्रकारचा गुन्हाच नाही 
  • सर्वजण कुटुंबासमवेत असल्याने गुन्हेगारांना मिळेना गुन्हा करण्याची संधी 
  • केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचे गुन्हेगारांनीही केले स्वागत 
  • पोलिसांवरील कामाचा तणाव झाला कमी : गुन्हेगारांना गुन्हे प्रवृत्ती सोडण्याचे केले आवाहन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no crime in the police within 48 hours