सकाळ ब्रेकिंग ! पोलिस बंदोबस्तात होणार शेतमालांचे लिलाव 

तात्या लांडगे
मंगळवार, 24 मार्च 2020

  • बाजार समिती बंद न ठेवण्याचे पणनचे निर्देश 
  • सभापती विजयकुमार देशमुखांनी मांडले जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे 
  • मंगळवारी (ता. 24) बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचीच झुंबड 
  • जिवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढू नयेत म्हणून बाजार समिती सुरुच राहणार 

सोलापूर : अत्यावश्‍यक सेवेत मोडणारी बाजार समिती बंद करु नये, असे स्पष्ट निर्देश पणनने दिले आहेत. मात्र, संचारबंदीमुळे दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या तुलनेत ग्राहकांचीच वर्दळ बाजार समितीत वाढली आहे. त्यामुळे आता उद्यापासून (बुधवारी) पोलिस बंदोबस्तात भाजीपाल्यांचे लिलाव होतील, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, बाजार समितीत ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे गाऱ्हाणे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले होते. 

हेही नक्‍की वाचा : थर्मल स्कॅनर मिळेना ! डॉक्‍टरांकडून एन-95 मास्कची मागणी 

कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारने ठोस उपाययोजना करीत संचारबंदी लागू केली. मात्र, त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आल्याची संधी साधून मंगळवारी (ता. 24) ग्राहकच थेट बाजार समितीत पोहचले. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या तुलनेत ग्राहकांचीच संख्या वाढल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि गुढीपाडवा होताच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाजार समिती बंद केल्यास जिवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती वाढतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सभापती श्री. देशमुख यांना सांगितले. त्यानंतर व्यापाऱ्यांची बैठक पार पडली आणि पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पुढे आली. त्यानुसार बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांशिवाय कोणीही येणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दिला जाईल, असे स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! रेल्वेला बसणार 11 हजार कोटींचा फटका 

पोलिस बंदोबस्तात होणार शेतमालांचे लिलाव 
जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती महाग होऊ नयेत, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी बाजार समितीचे लिलाव सुरुच राहतील. मंगळवारी (ता. 24) झालेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याचे मान्य केले असून आता गर्दी होणार नाही. 
- विजयकुमार देशमुख, सभापती, सोलापूर बाजार समिती 

हेही नक्‍की वाचा : रोजगार हिरावला ! बचत गटांच्या 10 लाख महिलांचा रोजगार हिरावला 

सभापती जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले... 

  • बाजार समितीत गर्दी वाढत असल्याने बाजार समिती बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी 
  • पणन विभागाच्या आदेशानुसार बाजार समिती सुरु : मात्र, गर्दी होणार नाही असे नियोजन करावे 
  • बाजार समितीतील विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा 
  • बाजार समितीत व्यापारी व शेतकऱ्यांशिवाय कोणालाही नसावा प्रवास 

हेही नक्‍की वाचा : भुजबळ कडाडले ! चढ्या दराने जिवनावश्‍यक वस्तू विकल्यास 7 वर्षांची शिक्षा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farm materials auction to be held in police settlement